शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६० डिस्टिलरी अन् ७० औषध कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:49 IST

कोरोनावर मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न, पुणे विभागात ३१ प्रस्तावांना मंजुरी

ठळक मुद्देसंपूर्ण जगभरात सध्या कोरोनाची भीती आहे. यासाठी दक्षता म्हणून हात स्वच्छ धुण्यास सांगितले जातेसॅनिटायझर वापरणे योग्य असल्याचे सांगितले जाते; मात्र सध्या सॅनिटायझर सहज व गरिबांना परवडेल अशा दरात मिळत नाहीराज्यातील साखर कारखाने, औषधी कंपन्या व विदेशी मद्य (दारू) तयार करणारे प्रकल्प सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढे आले

सोलापूर : संपूर्ण देश दहशतीखाली असलेल्या कोरोना या विषाणूमुळे पसरणाºया साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखाने व मद्य तयार करणारे खासगी प्रकल्प हँड सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढे आले आहेत. एकट्या पुणे विभागात ३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात ६० डिस्टिलरी व ७० औषधी कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मंजूर केले आहेत.

संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाची भीती आहे. यासाठी दक्षता म्हणून हात स्वच्छ धुण्यास सांगितले जाते. यासाठी सॅनिटायझर वापरणे योग्य असल्याचे सांगितले जाते; मात्र सध्या सॅनिटायझर सहज व गरिबांना परवडेल अशा दरात मिळत नाही. यामुळेच राज्यातील साखर कारखाने, औषधी कंपन्या व विदेशी मद्य (दारू) तयार करणारे प्रकल्प सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढे आले आहेत.

 राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत राज्य अन्न औषध प्रशासन आयुक्त मंजुरी दिली जात आहे. ज्या कारखान्यांकडे डिस्टिलरी ( आसवनी) प्रकल्प आहे अशांनाच सॅनिटायझर तयार करण्याचा परवाना मिळणार आहे. आलेल्या अर्जांपैकी कर्मयोगी अंकुशराव टोपे साखर कारखाना, जालना, वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना, सांगली, माळेगाव साखर कारखाना, पुणे व अजिंक्यतारा साखर कारखाना, सातारा, पांडुरंग कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठलराव शिंदे कारखाना, यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना, सातारा, लोकनेते सुंदरराव सोळुंके , बीड, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा लातूर, विलास साखर कारखाना, लातूर, श्री सोमेश्वर कारखाना, पुणे, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, लोकमंगल अ‍ॅग्रो, बीबीदारफळ, फॅबटेक शुगर, नंदूर मंगळवेढा, जकराया शुगर, वटवटे, मोहोळ, युटोपियन शुगर, कचरेवाडी, मंगळवेढा, या कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याशिवाय ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टिलरी, श्रीपूर,  विष्णू लक्ष्मी ग्रेप डिस्टिलरी अक्कलकोट रोड, सोलापूर व खंडोबा डिस्टिलरी, टेंभुर्णी या विदेशी मद्य तयार करणाºया प्रकल्पांनाही हँड सॅनिटायझर  तयार करण्यासाठी परवाने मिळाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच ३१ प्रस्ताव मंजूर केले आहेत. 

जिल्ह्यातील सात कारखान्यांचा समावेश- राज्यात साखर कारखानदारीत अव्वल असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांनी तसेच मद्य तयार करणाºया तीन अशा १० कारखान्यांतून सॅनिटायझर तयार होणार आहे. या सर्व प्रकल्पांना अन्न औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

औषधे तयार करणाºया विविध ७० खासगी कंपन्या तसेच डिस्टिलरी प्रकल्प असणाºया ६० साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने एका आठवड्यात मंजूर केले. जनआरोग्याचा हेतू समोर ठेवून या मंजुºया दिल्या. आणखीन काही प्रस्ताव मंजूर केले जातील.- अरुण उन्हाळेआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस