सावता महाराजांच्या भक्तांसाठी सुविधा निर्माण करु: रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:06+5:302021-02-05T06:44:06+5:30

अरण येथे आ. रोहित पवार यांनी बुधवारी संत सावता माळी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आ.संजयमामा शिंदे, महेश कोठे, ...

Let's create facilities for devotees of Sawta Maharaj: Rohit Pawar | सावता महाराजांच्या भक्तांसाठी सुविधा निर्माण करु: रोहित पवार

सावता महाराजांच्या भक्तांसाठी सुविधा निर्माण करु: रोहित पवार

अरण येथे आ. रोहित पवार यांनी बुधवारी संत सावता माळी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आ.संजयमामा शिंदे, महेश कोठे, जि. प. सदस्य भारत शिंदे, शिवाजीराजे कांबळे, देवस्थानचे सचिव विजय शिंदे, रमेश महाराज वसेकर, सुभाष गुळवे, विजयसिंह गिड्डे यांची उपस्थिती होती.

संत शिरोमणी सावता महाराज यांची कर्मभूमी व संजीवन समाधीने पावन असलेल्या अरण भूमीला नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. आपण ज्या मागण्या व याठिकाणी भक्त भाविकांसाठी सुखसोयी निर्माण करण्यासाठी केल्या आहेत त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिरात ग्रामस्थ व अन्नछत्र मंडळाच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरण तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी भारत शिंदे, शिवाजीराजे कांबळे, देवस्थानचे सचिव विजय शिंदे, रमेश महाराज वसेकर व हरिदास रणदिवे यांनी निवेदन दिले. यानंतर त्यांनी संत सावता महाराजांच्या मळ्यातील कांदा मुळा भाजीचे भोजन रमेश महाराज यांच्या निवासस्थानी घेतले.

यावेळी रविकांत महाराज वसेकर,दामोदर वसेकर,जनार्धन वसेकर, अंकुश वसेकर, सावता परिषदेचे संतोष राजगुरू, मृदूल माळी, कुरण गिड्डे, बाळासाहेब पाटील, दिग्विजय कांबळे, अन्नछत्र मंडळ न्यासाचे अध्यक्ष सावता घाडगे, सतीश घाडगे, बंडोपंत घाडगे, महादेव घाडगे, वसंत केदार, भारत गोरे, साधू गायकवाड,सचिन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----२८मोडनिंब-रोहित पवार---

Web Title: Let's create facilities for devotees of Sawta Maharaj: Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.