ट्रॅक्टरच्या उजेडात दिसला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST2020-12-23T04:19:34+5:302020-12-23T04:19:34+5:30
याबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शी शेतकरी धनाजी देशमुख म्हणाले, माझ्या ट्रॅक्टरच्या प्रकाशात मी त्याला अत्यंत जवळून पाहिले आहे. तो आमच्या ...

ट्रॅक्टरच्या उजेडात दिसला बिबट्या
याबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शी शेतकरी धनाजी देशमुख म्हणाले, माझ्या ट्रॅक्टरच्या प्रकाशात मी त्याला अत्यंत जवळून पाहिले आहे. तो आमच्या वस्तीच्या गोठ्यासमोर बराच वेळ दबा धरून बसला होता. बहुतेक हा बिबट्या आपल्या बछड्यांचा शोध घेत असावा, असा अंदाज आहे. वनविभागातर्फे झालेल्या कारवाईत धवलसिंह मोहिते-पाटील यांनी नरभक्षक बिबट्या ठार केल्यानंतर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आज मात्र पुन्हा दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.
दरम्यान, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांमधील महेंद्र पाटील यांनी याबाबतची माहिती तत्काळ वनाधिकारी संजय कडू, धैर्यशील मोहिते-पाटील यांना कळवली आहे. आता पुन्हा एकदा शोधण्याचे व पकडण्याचे वनविभागापुढे आव्हान उभे ठाकले आहे.
फोटो
२२ करमाळा-बिबट्या०१
ओळी
करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथे धनाजी देशमुख यांच्या शेतात दिसलेले बिबट्याच्या पायाचे ठसे.