शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सर्वांगाने विचार करण्याची क्षमता डावखुºया व्यक्तींंमध्ये असते अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:22 PM

वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे; कल्पनाशक्ती, गणित, चित्रकलेतही असतात पुढे

ठळक मुद्दे१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक डावखुरे दिन अर्थात वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे म्हणून साजरा केला जातोडावखुºया लोकांच्या मेंदूची विचारक्षमता इतरांपेक्षा अधिक वेगवान असल्यामुळे एकापेक्षा जास्त कामामध्ये ते तरबेज असतातसंशोधकांच्या मते डावखुºया लोकांमध्ये मेंदूच्या दोन्ही भागांचा समन्वय अधिक जलद आणि चांगल्याप्रकारे होतो

संजय शिंदे सोलापूर : डावखुºया व्यक्तींमध्ये सकारात्मक व सर्वांगाने विचार करण्याची क्षमता अधिक असते. एवढेच नव्हे तर कल्पनाशक्ती त्याचप्रमाणे गणित, चित्रकला यातही ते पुढेच असतात. त्यांचे अक्षरही चांगले असते, असे मत सोलापूर लेफ्ट हॅण्ड असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष आहेरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक डावखुरे दिन अर्थात वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर प्रा. आहेरकर डावखुºया व्यक्तींचे गुणविशेष सांगत होते. समाजामध्ये डावखुºया व्यक्तींविषयीचे मत आता पहिल्यापेक्षा सकारात्मक होत असल्याचे सांगतानाच पूजा करताना मात्र आजही उजव्या हाताचाच वापर करण्यात येत असल्याचे डॉ. आहेरकर सांगतात.

डावखुºया लोकांच्या मेंदूची विचारक्षमता इतरांपेक्षा अधिक वेगवान असल्यामुळे एकापेक्षा जास्त कामामध्ये ते तरबेज असतात. दैनंदिन जीवनात याचा त्यांना खूप फायदा होतो. आपल्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. संशोधकांच्या मते डावखुºया लोकांमध्ये मेंदूच्या दोन्ही भागांचा समन्वय अधिक जलद आणि चांगल्याप्रकारे होतो. त्यामुळे वेगवेगळे काम करताना त्यांची गफलत होत नाही.

डाव्या लोकांना कलात्मकतेचे वरदान लाभलेले असते. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, विद्यापीठातील डावे विद्यार्थी दृश्यस्वरूपाच्या विषयांत भाषात्मक विषयांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करतात आणि त्यामुळे त्या विषयांत पदवी ग्रहण करण्याची त्यांची शक्यता जास्त असते. लिओनार्दाे दा विंची, मायकलेंजेलो, राफायल आणि रेम्ब्रँटसारखे महान कलाकार डावखुरेच होते.

 गुणसूत्रावर डावखुरेपणा...-  मानवी शरीरातील गुणसूत्रे ही त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आॅक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक ब्रिस्टॉल आणि हॉलंडमधील मॅक्स प्लक इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या संशोधनानुसार गर्भाशयामध्ये विकसित होत असलेल्या गर्भाच्या गुणसूत्रात असमतोलपणा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधित व्यक्ती डावखुरा किंवा उजवा होण्यावर होतो.

डावखुºयांसाठी अनेक वस्तूंची निर्मिती- उजवे असणारे कुठलीही वस्तू सहजपणे हाताळतात. मात्र डावखुºयांसाठी ती अडचणीची ठरते. डावखुºयांसाठी इस्त्री, कात्री, आॅर्गन (बुलबुल), गिटार, तबला त्याचप्रमाणे टाईपरायटर की-बोर्ड अशा वस्तू आता बाजारात उपलब्ध आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय