जाणून घ्या; दोन कॉँग्रेसच्या वादावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:38 PM2020-09-11T12:38:54+5:302020-09-11T12:40:16+5:30

विरोधी पक्षनेतेपद : बळीरामकाकांना हटविण्याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे पत्र मिळाले

Learn; What did the president of Solapur Zilla Parishad say on the dispute between the two Congresses | जाणून घ्या; दोन कॉँग्रेसच्या वादावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले

जाणून घ्या; दोन कॉँग्रेसच्या वादावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या बैठकीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात हा चर्चेचा विषय झालाअनेक कार्यकर्ते विरोधी पक्षनेते साठे यांची वाट पाहत होते. पण सायंकाळपर्यंत ते आलेच नाहीतभ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यावर साठे म्हणाले, मी मुंबईत आहे. काँग्रेसच्या पत्रावर मी सोलापुरात आल्यावर बोलेन

सोलापूर : झेडपीतील पक्षनेतेपदाचा वाद मिटतो न मिटतो तोच आता विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून वादळ निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आता भांडण लागले असून, काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या पत्रावर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी डोक्याला हात लावत आता हे काय माझ्या डोक्याला ताप अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हा काँग्रेस पदाधिकाºयांची बुधवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीत जिल्हा दूध संघातील राजकारणावरून वातावरण तापले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद माजी आमदार दिलीप माने यांना बहाल केले व त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ही बाब काँग्रेसच्या पदाधिकाºयांना अजूनही खटकत असल्याचे त्यांच्या आरोपावरून दिसून आले. आता दूध संघातील वाटा गेल्याने जिल्हा परिषदेत वाटा घेण्याची आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिलेले पत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना गुरुवारी मिळाले.

टपालातून आलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या पत्रातील मजकूर वाचून अध्यक्ष कांबळे यांनी डोक्याला हात लावला. आता कुठे पक्षनेतेपदाचा वाद सोडविला आहे, आता विरोधी पक्षनेत्याचे हे काय माझ्या डोक्याला ताप असे म्हणत त्यांनी हे पत्र स्वीय सहायक तळेकर यांना दिले व आपल्या घटक पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा करून यावर निर्णय घेऊ असे सांगितले. 
विशेष म्हणजे पाटील यांनी अध्यक्षांना दिलेल्या पत्रात काँग्रेसच्या सदस्याला विरोधी पक्ष म्हणून नियुक्त करावे, असे म्हटले आहे. कोणाला करावे याचे नाव दिलेले नाही. एकूणच झेडपीचे राजकारण कोणत्या कोणत्या कारणावरुन रंगू लागली आहे. 


साठे म्हणाले मी मुंबईत
काँग्रेसच्या बैठकीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला. अनेक कार्यकर्ते विरोधी पक्षनेते साठे यांची वाट पाहत होते. पण सायंकाळपर्यंत ते आलेच नाहीत. भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यावर साठे म्हणाले, मी मुंबईत आहे. काँग्रेसच्या पत्रावर मी सोलापुरात आल्यावर बोलेन, इतकी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये फाटाफूट
जिल्हा दूध संघाच्या राजकारणावरून जिल्हा परिषदेत आघाडी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट होईल की काय, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषदेत फक्त सात सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायचे का, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Learn; What did the president of Solapur Zilla Parishad say on the dispute between the two Congresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.