‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 03:08 PM2019-03-06T15:08:48+5:302019-03-06T15:09:41+5:30

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ...

The leader said, 'Ujani water goes to Marathwada', people do not want to turn water out of heat. ' | ‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

googlenewsNext
ठळक मुद्देकै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याची तयारी झाली आहे, अशी चिंता झेडपीचे कृषी व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली. त्यावर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, काळजी करू नका, लोक ओढ्याचे पाणी वळवू देत नाहीत. उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी रंगभवन सभागृहात आयोजित कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात उजनी धरणाच्या पाण्यावर चिंतन झाले.

झेडपीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे  कै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य भारत शिंदे, मदन दराडे, संजय गायकवाड, रेखा राऊत, विभीषण आवटे, मीनाक्षी जगताप, मंजुळा कोळेकर, पंढरपूरचे सभापती राजेंद्र पाटील, मंगळवेढ्याचे सभापती प्रदीप खांडेकर, दक्षिणच्या सभापती सोनाली कडते, श्रीमंत थोरात, गहिनीनाथ नाईकनवरे, मंगल वाघमोडे, स्वाती कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली आहे. पण शेतकºयांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून नेमके याकडेच सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अध्यक्षीय भाषणात संजय शिंदे यांनी कृषी क्षेत्रात प्रयोगशील काम करणाºयांना पुरस्कार देऊन स्फूर्ती देण्याचे काम झेडपीने केले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतकरी शेतीत प्रयोग करीत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे नमूद केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे मार्गदर्शन झाले. पुरस्कार शेतकºयांचा फेटा, शाल, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

शिंदे—ढोबळे यांच्यात संवाद
झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे दोन आठवड्यानंतर सोलापुरात आले. कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बसलेले असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा त्यांना सारखा कॉल येत होता. शेवटी त्यांनी रंगभवन सभागृहात असल्याचे शिंदे यांनी सांगितल्यावर ढोबळे तेथे आले. समोर प्रेक्षकगृहात बसल्यावर शिंदे यांनी त्यांना व्यासपीठावर येण्यास सांगितले. त्यानंतर दोघांत सतत संवाद सुरू होता. हे दोघे नेमके काय बोलत असावेत याचीच चर्चा सभागृहात सुरू झाली.

पुरस्कारप्राप्त शेतकरी असे
आदर्श गोपालक : विनायक पाटील, समीर भोरे, किरण सावंत, धनंजय शिंदे, सचिन बाबर, भिवा शिंदे, दत्तात्रय शिंदे, शशिकांत नागटिळक, मल्लिकार्जुन कोले, अर्जुन घाडगे, दत्तात्रय ढेकळे. कृषीनिष्ठ : बसवराज बेळ्ळे, दत्तात्रय पाटील, अभिजित भांगे, रुपाली काळे, शरद शिंदे, अमोल लाड, बाबासाहेब थोरात, बाळासाहेब यलगोंडे, काशिनाथ कदम, विजय गवळी, नितीन पाटील. शासन पुरस्कृत कृषिभूषण: अतुल बागल, शशिकांत पुदे, तुकारात पडवळे, रामचंद्र आलदर, मकरंद सरगर. कृषीमित्र : शंकर मिरगणे, भीमराव सूळ, सिद्धेश्वर नागटिळक, सचिन चव्हाण, शंकर पाथरवट. उत्कृष्ट सरपंच व ग्रामसेवक : नारायण ढवळे (ग्रामसेवक, शेगाव दुमाला), विष्णू अरकले (सरपंच, शेगाव दुमाला), संगनबसप्पा ठक्का (ग्रामविकास अधिकारी, करजगी), प्रिया तोडकरी (सरपंच, करजगी), बालम बादशहा कोरबू (ग्रामसेवक , बोंडले), राखी गायकवाड (सरपंच, बोंडले).

Web Title: The leader said, 'Ujani water goes to Marathwada', people do not want to turn water out of heat. '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.