शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा, सोलापूरातील धर्मजागृती सभेत आमदार राजासिंह ठाकूर यांचे मत, सोलापुरात हिंदूंनी जागवली हिंदुत्त्वाची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:01 IST

सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे : राजासिंह ठाकूरअखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे : राजासिंह ठाकूरदेशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो : स्वाती खाडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी हिंदंूनी संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी सोलापुरात केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील पुंजाल क्रीडांगणावर आयोजित हिंदू धर्मजागृती सभेमध्ये ते बोलत होते.  यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाडये, समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मनोज खाडये आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. आपल्या भाषणातून आमदार ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. धर्मासाठी जातपात विसरुन एकत्र येण्याची  गरज आहे. अखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे. देश पुढे जाण्यासाठी धर्म सुरक्षित राहायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सद्गुरु  यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विरांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतीयांना आहे; मात्र त्यांना शौर्यहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो. हे रोखण्यासाठी प्रत्येक युवा-युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. मनोज खाडये म्हणाले, सध्या काही हिंदू प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. यामुळे धर्मांतर बंदीचा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. धर्मसभेला पोलिसांनी बंदोबस्त दिला, हे चांगले असून त्यांनी हाच बंदोबस्त आतंकवादी बनण्याच्या ठिकाणी पुरवायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली.  सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने झाला. दीपप्रज्वलनानंतर वेणूगोपाल जिल्ला पंतलु, भानुचंद्र चिप्पा, व्यंकटेश श्रीमल, श्रीनिवास जिल्ला यांनी वेद मंत्रपठण केले. सभेचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख आणि  संजय इंगळे यांनी   केले. या सभेसाठी पुंजाल मैदानावर मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी हजेरी लावली. ------------------------सुराज्य अभियानात सहभागी व्हा!- गेली ७० वर्षे देशाचा विकास करु असे सांगून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले,  मात्र आजपर्यंत देशातील दारिद्र्य, शेतकºयांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सुटल्या नाहीत. या देशातील भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्याने जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. त्याविरुद्ध आपण उभे राहायला हवे. या लोकशाहीत प्रबळ झालेल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ आरंभले आहे, त्यात सहभागी होण्याचे आवाहन  मनोज खाडये यांनी केले. 

टॅग्स :Solapurसोलापूर