स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:32+5:302021-09-23T04:24:32+5:30

याशिवाय रक्तदान शिबिर आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट व ...

Late. Unveiling of a full-length statue of Satalingappa Mhetre | स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

याशिवाय रक्तदान शिबिर आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यासह आळंद, अफजलपूर तालुक्यातील सर्व म्हेत्रे प्रेमी, काँग्रेस कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित राहून सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रथमेश म्हेत्रे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, डाॅ. उदयकुमार म्हेत्रे, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मुबारक कोरबू, महिला शहराध्यक्ष सुनीता हडलगी, नगरसेवक विकास मोरे, चंदन आडवितोटे, सद्दाम शेरीकर, रमेश स्वामी, सुनील खवळे, धर्मराज गुंजले, राहुल मोरे, वशीम कुरेशी, शबाब शेख, मुस्तफा बळोरगी, बसवराज अळ्ळोळी, राजू पाटोळे, जगदीश हळगोदे, सुनील इसापुरे, रुद्रय्या स्वामी, सरफराज शेख, राहुल भकरे, महादेव चुंगी, फारुक बबर्ची, सिद्धू म्हेत्रे, अभिजित आडवितोटे, विकी कोरे आदी उपस्थित होते.

...........

फोटो : सातलिंगप्पा म्हेत्रे

220921\img-20210921-wa0017.jpg

स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा फोटो

Web Title: Late. Unveiling of a full-length statue of Satalingappa Mhetre