पांडुरंगाला १०.५ तोळे, रुक्मिणीला सव्वापाच तोळ्यांचा लक्ष्मीहार अर्पण

By दिपक दुपारगुडे | Updated: November 13, 2023 13:27 IST2023-11-13T13:25:49+5:302023-11-13T13:27:02+5:30

मंदिर समितीच्या वतीने कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.

lakshmihar offering of 10 5 tolas to panduranga 5 tolas to rukmini devi | पांडुरंगाला १०.५ तोळे, रुक्मिणीला सव्वापाच तोळ्यांचा लक्ष्मीहार अर्पण

पांडुरंगाला १०.५ तोळे, रुक्मिणीला सव्वापाच तोळ्यांचा लक्ष्मीहार अर्पण

दीपक दुपारगुडे, सोलापूर : नाशिक येथील रहिवासी कैलासवासी नामदेव श्रावण पाटील यांनी कामिनी एकादशीला पांडुरंगासाठी साडेदहा तोळ्याचा राजेवाडी हार अर्पण केला होता. आपण रुक्मिणी मातेसाठी काही केले नाही ही खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी रुक्मिणी मातेसाठी सव्वा पाच तोळे वजन असलेला ३ लाख १२ हजार ६१० रुपये किमतीचा हार बनवण्यास दिला; परंतु दुर्दैवाने त्यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रुक्मिणी मातेला लक्ष्मी हार अर्पण करण्याचे त्यांचे स्वप्न, त्यांची इच्छा त्यांच्या पत्नी गीताबाई नामदेव पाटील, मुलगा सुनील नामदेव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंढरपूरला येऊन त्यांची अंतिम इच्छा पूर्ण केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने पाटील कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.

Web Title: lakshmihar offering of 10 5 tolas to panduranga 5 tolas to rukmini devi