सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार नवसंजीवनी

By Appasaheb.patil | Published: February 6, 2021 11:25 AM2021-02-06T11:25:48+5:302021-02-06T11:27:02+5:30

सोलापूर विभागासाठी ९०० कोटींची तरतूद: दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामालाही येणार गती

Kurduwadi workshop along with Solapur-Osmanabad railway line will get rejuvenation | सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार नवसंजीवनी

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार नवसंजीवनी

googlenewsNext

सोलापूर : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाच्या कामासह अन्य कामांच्या पूर्णत्वासाठी ९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुर्डूवाडी वर्कशॉपसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अन्य कामासाठी निधी लागणार असल्यास तोही त्वरित देऊ, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सोलापूर विभागाला देण्यात आल्याचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात रेल्वेच्या अर्थसंकल्पाचाही समावेश होता. मध्य रेल्वेसाठी या अर्थसंकल्पात ४ हजार ८३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण, लातूर कोच फॅक्टरी, कुर्डूवाडी वर्कशॉप यासह अन्य कामांसाठी निधीची तरतूद झाली आहे. सोलापूर विभागातून जाणाऱ्या बीड-परळी- वैजनाथ या नव्या मार्गासाठी ५२७ कोटी, सोलापूर- उस्मानाबादसाठी २० कोटी व दौंड-मनमाड यासाठी २५ कोटी, पंढरपूर- फलटण मार्गासाठी १ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मार्चमध्ये सुरू होणार हुतात्मा अन् इंद्रायणी

कोरोनानंतर रेल्वेची प्रवासीसेवा पूर्ववत होत आहे. सोलापूर विभागातून धावणाऱ्या ६० टक्के पॅसेजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही एक्स्प्रेस गाड्या विशेषगाड्या म्हणून सुरू आहेत. सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता हुतात्मा व इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल. शक्यतो मार्च महिन्यात या दोन्ही गाड्या सुरू होतील, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी दिली.

सोलापूर-उस्मानाबादसाठी आणखीन लागणार ३०० कोटी

सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यासंदर्भातील डीपीआर तयार झाला आहे. हा डीपीआर मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यास भूसंपादनाचे काम सुरू होईल, त्यानंतर टेंडर प्रक्रिया होईल. मगच रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागतील. या मार्गाच्या कामासाठी आणखीन ३०० कोटी रुपयांची गरज असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Kurduwadi workshop along with Solapur-Osmanabad railway line will get rejuvenation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.