शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

सोलापूरातील कुमठे मलनिस्सारण केंद्र होणार कार्यान्वित, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी घातले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:14 PM

नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.   

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे मोहीमखड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची हे तपासले जाईल : आयुक्त डॉ. ढाकणे प्रतापनगर मलनिस्सारण केंद्रातील पाणी सोडण्याचे अडलेले काम लवकर संपविण्याच्या सूचना

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.   स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेला चांगले यश आले. पण प्रतापनगर व कुमठे येथील मलनिस्सारण केंद्राचे काम रखडल्याने विजापूर रोड, जुळे सोलापूर आणि होटगी रोड परिसरातील नागरिक समस्याने ग्रासल्याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला. जुळे सोलापूर परिसरात नव्याने झालेल्या वसाहतीत अनेकांकडे ड्रेनेजसाठी  शोषखड्डे आहेत. हे खड्डे भरू लागल्याने वापराचे पाणी मोकळ्या जागेत सोडले जाते. यामुळे अनेक ठिकाणी उघड्या गटारी व डबके तयार झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या भागात डेंग्यू, मलेरिया साथींचा प्रभाव जादा दिसून येत आहे. ड्रेनेज योजना मार्गी लागल्यास नागरिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कुमठे मलनिस्सारण ड्रेनेजलाईनचे काम अडले आहे. वीज जोडणी पूर्ण करून केंद्राची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे ज्या भागात काम पूर्ण झाले आहे, तेथील ड्रेनेज जोडणीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलीजुळे सोलापुरात प्रॉपर्टी जोडणीचे काम मंदगतीने सुरू आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या महिन्यात लक्ष घातले होते. आॅक्टोबरअखेर ही योजना कार्यान्वित करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते.                      पण अडचणीमुळे काम लांबले. ७0 फूट रोडवर प्रॉपर्टी जोडणीसाठी नवा रस्ता खोदण्यात आला पण हे खड्डे पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम होऊन महिना लोटला तरी खड्डे जैसे थे आहेत. यातून जाणाºया वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची हे तपासले जाईल असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. ---------------------काम लवकर संपवाप्रतापनगर मलनिस्सारण केंद्रातील पाणी सोडण्याचे अडलेले काम लवकर संपविण्याच्या सूचना दिल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. हे काम झाले की नागरिकांना ड्रेनेज जोडणीस परवानगी दिली जाईल. अद्याप पॉपर्टी जोडणीचे मोठे काम राहिल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात खोदलेले रस्ते व प्रॉपर्टी जोडणीचे काम स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिका