कोतवालाची सून झाली कारीची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST2021-02-12T04:21:01+5:302021-02-12T04:21:01+5:30

सरपंचपदी नीलम अनिल कदम यांची तर उपसरपंचपदी खासेराव विनायक विधाते यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या ४० वर्षांपासून कारीत हवेली ...

Kotwala's daughter-in-law became the Sarpanch of Kari | कोतवालाची सून झाली कारीची सरपंच

कोतवालाची सून झाली कारीची सरपंच

सरपंचपदी नीलम अनिल कदम यांची तर उपसरपंचपदी खासेराव विनायक विधाते यांची बिनविरोध निवड झाली.

गेल्या ४० वर्षांपासून कारीत हवेली गटाची एकहाती सत्ता होती, परंतु २००९ पासून तरुणाचा शिरकाव झाला व सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. तरुणांची तिसरी आघाडी निर्माण झाली. मोठ्या अटीतटीच्या लढाईत विधाते हवेली व तिसरी आघाडी यांचे खंडेराया ग्राम विकासआघाडी गटाला ९ जागा मिळाल्या व डोके-गायकवाड तुळजाभवानी ग्रामविकास आघाडी गटाला ४ जागावरच समाधान मानावे लागले.

याप्रसंगी सदस्य सना फिरदोस जमीर मुलाणी, लता अशोक डोके, अमोल तेलंगे, अधिका चव्हाण, अतुल चालखोर, तेजश्री रवींद्र आटपळकर, मेघा बनसोडे मेघा उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीणकुमार शिंदे यांनी तर त्यांना एस. आर. पवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Kotwala's daughter-in-law became the Sarpanch of Kari