कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी रस्ता होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:23+5:302021-08-25T04:27:23+5:30

सोलापूर: कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांन गुणवत्तेची कामे करुन रस्ते ...

The Kondi-Akolekati-Sawantwadi road will be shiny | कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी रस्ता होणार चकाचक

कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी रस्ता होणार चकाचक

सोलापूर: कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांन गुणवत्तेची कामे करुन रस्ते चकाचक करावीत, अशी अपेक्षा ठेकेदारांकडून केली.

गावकऱ्यांनी वस्त्यांसाठी विजेची सोय करा आणि उजनीच्या पाण्याची मागणी केली. त्यावर आमदार माने यांनी पाण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक लावू, असे सांगितले. या रस्त्याच्या कामाला ६ कोटी खर्च येणार आहे.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, गणेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, बालाजी पवार, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, शिवसेनेचे विक्रांत काकडे, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत, सरपंच भाऊसाहेब लामकाने, प्रकाश लामकाने, राजेंद्र घाटे व इतर उपस्थित होते.

---

--------

फोटो-२३ वडाळा

कोंडी-अकाेलेकाटी-सावंतवाडी रस्त्याचे भूमिपूजन करताना आमदार यशवंत माने, बळिराम साठे, प्रल्हाद काशीद, बालाजी पवार,

Web Title: The Kondi-Akolekati-Sawantwadi road will be shiny