शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जाणून घ्या... रणरणत्या उन्हात फिरणाºया कार्यकर्त्यांनी काय घ्यावी काळजी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:39 IST

सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : जास्त पाणी प्या, शक्यतो बाहेरचे खाणे टाळा

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजशी गती येत आहे तसेच शहरातील तापमानही वाढत चालले आहेवाढत्या तापमानामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची दमछाकरणरणत्या उन्हात प्रचार करताना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजशी गती येत आहे तसेच शहरातील तापमानही वाढत चालले आहे. वाढत्या तापमानामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची दमछाक होत असून रणरणत्या उन्हात प्रचार करताना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दर पाच वर्षांनी येणाºया लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात येत असतात. या दोन महिन्यात सर्वत्र उन्हाचा कडाका असतो. सोलापूर ‘ड्राय वेदर’ सिटी असल्यामुळे येथे कोरडी उष्णता असते. या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत सध्या उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते हे प्रचार फेरीद्वारे घरोघरी पोहोचत आहेत. कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी डोक्यावर टोपी, अंगात सुती कपडे, डोळ्यांवर गॉगल आणि सोबत पाण्याची बाटली ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जास्तीत जास्त पाणी पिऊन बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळल्यास तब्येत बिघडण्याचा धोका कमी संभवतो,  असेही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

भर उन्हात थंडपेय टाळारणरणत्या उन्हात प्रचारासाठी फिरणाºया कार्यकर्त्यांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील, यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. दुपारी जेव्हा सर्वाधिक तापमान असते, अशावेळी डोके व शरीर यांना संरक्षण द्या. प्रचार करून घरी आल्यानंतर लगेच थंड पेय पिण्याचे टाळावे. दिवसातून दोन वेळा थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी. याउपरही प्रकृती बिघडल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. - डॉ. एस. बी. कांबळे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी

उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यतायावर्षी एप्रिलच्या प्रारंभीच पारा ४३ अंशाकडे वाटचाल करत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर मे अखेरपर्यंत सोलापुरातील गेल्या तीस वर्षांतील उच्चांकी तापमान असू शकते. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि पाण्याच्या साठ्यांचे संवर्धन होत नसल्यामुळे यापुढे वरचेवर तापमानात वाढ होत जाणार आहे. यावर तोडगा म्हणून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करण्याची गरज आहे.    - डॉ. विनायक धुळप,  हवामान तज्ज्ञ

हे कराल तर फिट राहाल

  • 1.घराबाहेर पडताना पातळ, सुती, फिक्या किंवा पांढºया रंगाचे कपडे वापरावेत. 
  • 2. डोक्याला टोपी, डोळ्यांना गॉगल असावा. उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी संपूर्ण अंग झाकणारे असावेत. 
  • 3. तिखट, खूप गरम, रुक्ष असे पदार्थ टाळावेत. ताक भरपूर प्यावे. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबूचे सरबत, शहाळाचे पाणी प्यावे.
  • 4. उसाच्या रसात किंवा कोणत्याही पेयात बर्फ टाकून घेऊ नका.
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाTemperatureतापमान