किशोर बगाडे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:20+5:302021-03-04T04:41:20+5:30

कुसळंब : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे ‘लोकमत’ एक्सलंट टीचर्स किशोर बगाडे यांचा पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ...

Kishor Bagade felicitated | किशोर बगाडे यांचा सत्कार

किशोर बगाडे यांचा सत्कार

कुसळंब : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे ‘लोकमत’ एक्सलंट टीचर्स किशोर बगाडे यांचा पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमत एक्सलंट टीचर्स कॉफी टेबल आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अनिल पाटील, प्राध्यापक विलास जगदाळे होते. तर पांगरीच्या नूतन सरपंच सुरेखा विलास लाडे, उपसरपंच धनंजय खवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बगाडे यांच्या कार्याची ओळख करून देणार्‍या लोकमत एक्सलंट टीचर्स २०२० कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले.

कार्यक्रमास विलास जगदाळे, संजीव बगाडे, पत्रकार कृष्णाथ बोधे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक संजय बगाडे, सुहास देशमुख, पंचफुला बगाडे, तंटामुक्ती अध्यक्ष रियाज बागवान, इन्नूस बागवान, गणेश गोडसे, भरत बगाडे, उमेश गाढवे, श्री हरी गायकवाड, संजय गाढवे, सिकंदर शेख, संजय बोकेफोडे, ज्येष्ठ पत्रकार तात्या बोधे उपस्थितीत होते.

----

०३ किशोर बगाडे

किशाेर बगाडे यांचा सत्कार करताना सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल. यावेळी अनिल पाटील, प्राध्यापक विलास जगदाळे,

Web Title: Kishor Bagade felicitated