पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: May 31, 2023 18:33 IST2023-05-31T18:33:19+5:302023-05-31T18:33:39+5:30

तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे.

kidnapping and molesting a minor girl crime of child harassment against youth | पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा

विलास जळकोटकर, सोलापूर : आइस्क्रीम खाऊन येते म्हणून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पुणे, महाबळेश्वर अशा ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऋषिकेश हणमंत टिंगरे या तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील पीडित मुलगी ही शहरातील एका भागात वास्तव्याला असून, तिचे आईवडील मजुरी करून उपजीविका करतात. २५ मे रोजी तिने वडिलांकडून १०० घेऊन आइस्क्रीम खाऊन येथे म्हणून बाहेर पडली. शोधाशोध करूनही सापडली नाही म्हणून फौजदारी चावडी पोलिस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली.

त्यानुसार तपासात पोलिसांना पीडित मुलगी ३० मे रोजी आढळून आली. तिच्या आईवडिलांना खबर दिल्यानंतर पीडितेने दिलेल्या जबाबामध्ये सदर आरोपी ऋषिकेश टिंगरे याने पीडितेला पुणे, महाबळेश्वर, सांगोला येथे नेऊन तिच्याशी जवळीकता साधून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा जबाब नोंदवला. त्यानुसार भादंवि ३६३, ३७६ जे, पॉक्सो, बाललैंगिक कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: kidnapping and molesting a minor girl crime of child harassment against youth