शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अनोखे आंदोलन; सोलापूर शहर नव्हे खड्डापूर शहर, संभाजी ब्रिगेडने लावला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 12:35 IST

सोलापूर - सोलापूर शहरांमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ता खोदाई चे काम सुरू ...

ठळक मुद्देसोलापूर शहरात ड्रेनेज व जलवाहिनी टाकण्याची कामे एकसाथ सुरू आहेतशहरातील सर्वच रस्त्यावर  सर्वाधिक भागांमध्ये रस्त्यांची खोदाई केलेली आहेखड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिकच अडचणीचे बनला

सोलापूर - सोलापूर शहरांमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ता खोदाई चे काम सुरू असल्यामुळे चांगल्या रस्त्याची वाट लागलेली आहे त्यामुळे सोलापुरातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या नागरिकांना प्रचंड हाल सोसावी लागत आहे. स्मार्ट सिटीत समावेश असणार्‍या सोलापूर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापूर हे स्मार्ट सिटी आहे का खड्ड्यांची सिटी आहे अशी बाहेरील येणार्‍या लोकांची धारणा होईल  त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात  सोलापूर शहर नव्हे तर खड्डापूर शहर असे फलक लावून महानगरपालिकेला सुबुद्धी यावी व लवकरात लवकर हे शहर खड्डेमुक्त होऊन चांगले रस्ते व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम  जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर शहरात ड्रेनेज व जलवाहिनी टाकण्याची कामे एकसाथ सुरू आहेत. यामध्ये शहरातील सर्वच रस्त्यावर  सर्वाधिक भागांमध्ये रस्त्यांची खोदाई केलेली आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिकच अडचणीचे बनला. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावर चारचाकी वाहने, तर सोडाच पण अगदी दुचाकी चालवता येत नाहीत. दुचाक्‍यांची संख्या वाढली, तर पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी रस्ता राहत नाही.  अनेकवेळा काही भागांमध्ये सायंकाळनंतर पथदिव्यांचा प्रकाश कमी असतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक मोबाईल गल्ली, नवी पेठ, फौजदार चावडी, चाटी गल्ली, मधला मारुती, भांडे गल्ली व हद्दवाढ आदी भागांमधील सर्व रस्ते खोदकामामध्ये अडकले आहेत 

खड्डेमय रस्त्यांवर वाहन चालवल्याने मान आणि मणक्याचे दुखणे सुरू होते. वृध्दांना कंबरेचा त्रास होतो तसेच वाहनांचे सुधा नुकसान होते अधिक धूळ तयार होऊन श्वसनाचे व डोळ्याचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागात चांगले असलेले रस्ते खोदण्यात आले आहे काम झाले तरी नवीन रस्ते न करता मुरुम टाकून बुजविण्यात आले आहे.

सोलापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून चांगल्या दर्जाचे रस्ते करावेत अन्यथा संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले,कार्याध्यक्ष अरविंद शेळके, नागेश पवार, उपशहरप्रमुख आशुतोष माने, सीताराम बाबर सोमनाथ पात्रे,सचिव सनी पाटू, राहुल घोडके, महेश तेल्लुर, विजय क्षीरसागर, मेऊल बुरे,इलियास शेख, शाहरुख पटेल, रमेश तरंगे, अक्षय साळुंखे, विनोद झळके, अक्षय जाधव, ईत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीroad transportरस्ते वाहतूकsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड