शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

केसर, पायरी, दसेरी, बदाम आंब्यांचा सोलापुरात तोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:05 IST

मंगळवारी अक्षयतृतीया : देवगढ हापूस, केसर हापूसला पसंती

ठळक मुद्देसोलापूरमध्ये अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर केसर, पायरी, दसेरी आणि बदाम आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणातया आंब्यांचा तोरा वाढला असून खवय्येगिरीत पुढे असणाºया सोलापूरकरांनीही चांगलीच पसंती दिली आहे.

सोलापूर : डाळींब आणि ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर केसर, पायरी, दसेरी आणि बदाम आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आंब्यांचा तोरा वाढला असून खवय्येगिरीत पुढे असणाºया सोलापूरकरांनीही चांगलीच पसंती दिली आहे.

मंगळवारी सर्वत्र अक्षयतृतीया साजरी होत असून या पार्श्वभूमीवर यंदाही गुजरात, वलसाड, चाकूर आणि जुनागढमधून केसर आंबा दाखल झाला आहे़ याबरोबरच रत्नागिरीतून पायरी दाखल झाला आहे़ विशेषत: लखनौमधून दसेरी आंबा आला आहे, याशिवाय हैदराबादहून बदाम आणि बेईनशा अशा दोन प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. बदाम आणि बेईनशा आंब्यांची आवक बाजारात जास्त प्रमाणात आहे. काही लोक आंब्यांच्या तयार रसाला पसंती दिली आहे. बाजारात आंबे अनेक प्रकारचे अनेक प्रांतातून दाखल झाले असून मुबलक उपलब्धतेमुळे यंदा दर स्थिर आहेत.

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ट्रकमधून माल मोठ्याप्रमाणात दाखल होतोय़ यामुळे यंदा आडत व्यापाºयांपुढे मुबलक उपलब्ध झालेला आंबा बाजारात संपवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत़ अक्षयतृतीयपूर्वीच याची खरेदी-विक्री वाढली आहे़ तसेच काही दिवसात यांचे दरही उतरण्याची शक्यता व्यवसायिकांनी वर्तलवली आहे़ यंदा वादळी ाºयाचे प्रमाणही कमी असल्याने कच्चा आंबा बाजारात कमी आहे.आंध्रमधील हिमायतचे प्रथमच आगमन यंदा बाजारात प्रथमच ‘हिमायत’ नावाचा आंबा दाखल झाला आहे़ तो आंध्रप्रदेशातून दाखल झाला आहे़ अल्पावधीत सोलापूरकरांच्या जीभेवर त्याने साखरेप्रमाणे गोढी वाढवली आहे़ विशेषता याचा दर हा १६० रुपये किलो आहे़ त्यामुळे सर्वच वर्गातील नागरिक ांकडून या आंब्याला मागणी आहे़ यापूर्वी हा आंबा सोलापुरकरांना माहीत नव्हता़ काही लोक खाऊन झाल्यानंतर खासकरुन या आंब्यांच्या कोयी राखून ठेवताहेत आणि घरामधील कुंडीत लावण्याचा प्रयत्न करताहेत़ लक्ष्मी मार्केटमधील शुक्रवारचे दर केसर (१०० ते १४०)रत्नागिरी पायरी (१५० ते ३००)लालबाग (६० ते ८०)देवगढ हापूस / रत्नागिरी हापूस (३०० ते ८००)दसेरी आंबा (८९ ते १६०)बदाम (४० ते ८०)बेईनशा (४० ते ८०)हिमायत (१६०)

यंदा आंब्याला मागणीही खूप आहे आणि आवकही मुबलक आहे़ जिल्ह्यात सर्वच माल हा जवळच्या बाजार समितीतून नव्हे तर खुल्या बाजारातून वा सरळ उत्पादक शेतकºयांकडून आयात केला जातोय़ यंदा विशेषत: आंध्रमधून दाखल झालेल्या हिमायत नावाच्या आंब्याला मागणी सर्वाधिक आहे़ पुणे आणि मंबईतील काही नातेवाईकांना हा आंबा सोलापूरकरांनी पाठवला आहे़ - फरिद शेखफळ विके्रते

टॅग्स :SolapurसोलापूरMangoआंबाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती