पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 16:33 IST2021-02-20T16:32:59+5:302021-02-20T16:33:34+5:30

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची पत्रकार परिषद

Keep the monastery in Pandharpur empty, otherwise the crime will be filed | पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल

पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल

पंढरपूर : कोरानामुळे वारकऱ्यांना माघ यात्रानिमित्त पंढरपुरात येण्यास मज्जाव केला आहे. यामुळे वारकरी यात्रे पूर्वीच पंढरपुरात प्रवेश करून मठामध्ये मुक्काम करत आहेत. यामुळे मठ मोकळे ठेवा अन्यथा मठाधिपतींवर गुन्हा दाखल केला जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. 

माघ वारी च्या पार्श्भूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिसांना सूचना देण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी पंढरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो. नि. अरुण पवार, पो नि. प्रशांत भस्मे उपस्थित होते.

पुढे झेंडे म्हणाले, स्थानिक नागरिकांना एस टी ने पंढरपुरात येण्यास मज्जाव नाही. परंतु भाविकांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचं बरोबर यात्रेपूर्वी पंढरीतील यामध्ये अनेक वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे. वारकऱ्यांनी शनिवारी रात्री बाराच्या आत पंढरपुरातून माघारी जायचे आहे. मठांची तपासणी करण्यासाठी चार पथक नेमण्यात आले आहेत. ज्या मठामध्ये रविवारी भाविक असल्याचे आढळून आल्यास, त्या संबंधित मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.


असा आहे पोलिस बंदोबस्त

  • जिल्हा पोलीस अधीक्षक २
  • उपविभागीय पोलिस अधिकारी ३  पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक / उप पोलीस निरीक्षक ९०, 
  • पोलीस कर्मचारी ८००, 
  • आर सी पी (दंगा काबू पथक) १, 
  • एस आर पी एफ १ कंपनी
  • होमगार्ड - ६००

Web Title: Keep the monastery in Pandharpur empty, otherwise the crime will be filed