शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

करमाळा बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:12 PM

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली.

ठळक मुद्दे हरकती दाखल करण्यासाठी २५ जूनपर्यंतची मुदत१३ जूनपासून प्रारूप मतदार यादी पाहायला मिळेल

सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली. त्यावर हरकती दाखल करण्यासाठी २५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. 

सोलापूर आणि बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यादरम्यान जिल्हा निवडणूक कार्यालयाने ३१ डिसेंबर २०१७ हा अर्हता दिनांक निश्चित करून करमाळा तहसीलदारांना करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी १५ गणातील १ लाख १४ हजार ८०० मतदारांची प्रारूप यादी सादर केली.

अडते आणि व्यापारी मतदारसंघात २४२ आणि हमाल-तोलार मतदारसंघात १४१ मतदारांचा समावेश आहे. बाजार समितीच्या मतदार यादीसंदर्भात हरकती असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या नावे करमाळा तहसील कार्यालयात २५ जूनपर्यंत दाखल कराव्यात, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कळविले आहे. या दावे-हरकतींवर २६ जून ते ७ जुलै या कालावधीत निर्णय घेण्यात येईल. १३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. १० गुंठ्यांवर शेतजमीन धारण करणाºया शेतकºयांचा बाजार समितीच्या मतदार यादीत समावेश करण्यात येतो. 

येथे पाहायला मिळेल...- जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, तहसील कार्यालय करमाळा, सहायक निबंधक सहकारी संस्था करमाळा यांचे कार्यालय येथे १३ जूनपासून प्रारूप मतदार यादी पाहायला मिळेल. 

गणाचे नाव आणि एकूण मतदारसंख्या- जातेगाव ७९१४, पोथरे ७६५२, रावगाव ६६५०, वीट ७५२०, सावडी ८२७४, जिंती ६१५७, राजुरी ६७८०, वाश्ािंबे ६३९१, उमरड ७६१६, झरे ९०२७, हिसरे ८५२८, साडे ७७६४, केम ९९६७, वांगी ६७३३, कंदर ७८१७. अडते-व्यापारी २४२, हमाल-तोलार १४१. असे एकूण १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक