कमळाबाई पानी यांचे निधन
By Admin | Updated: February 13, 2015 00:49 IST2015-02-13T00:26:57+5:302015-02-13T00:49:29+5:30
सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, बागलकोट येथील महिला कार्यकर्त्यांना धक्का बसला.

कमळाबाई पानी यांचे निधन
सांगली : वेश्या एड्स मुकाबला परिषदेच्या उपाध्यक्षा आणि संग्राम संस्थेच्या कार्यकर्त्या कमळाबाई गुळाप्पा पानी (वय ६०) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, बागलकोट येथील महिला कार्यकर्त्यांना धक्का बसला.सांगलीसह राज्यभरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने न्याय मिळवून देणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या कमळाबाई पानी यांचे कार्य अतुलनीय होते. अन्याय मुक्ती परिषद या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजात त्यांचे स्थान मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. परिषदेच्यावतीने महिला आरोग्य, मानवी हक्क, वेश्या आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण यासाठी त्यांनी विविध उपक्रम यशस्वी केले. अतिशय धाडसी आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.आज (गुरुवारी) संग्राम, व्हॅम्प, मुस्कान, कसत, विद्रोही महिला मंच, मित्रा, नजरिया आदी संघटनांतील कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)