- बाळकृष्ण दोड्डीलोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : चादरीचे शहर म्हणून अवघ्या देशात लौकिक असलेल्या सोलापूरची ही ओळख आता पुसली जात असून, हे शहर आता टॉवेलचे शहर म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. चादरी उत्पादनात मात्र सोलापूरची जागा पानिपतने घेतली आहे. विशेष म्हणजे ‘पानिपत’वालेही आपले उत्पादन ‘सोलापुरी चादर’ नावानेच विकत आहेत. सोलापुरात पूर्वी ८ ते १० हजारांहून अधिक पॉवर लूमवर सोलापुरी चादरीचे उत्पादन व्हायचे. आता ही संख्या केवळ आठशेवर आली आहे.
टेरिटॉवेलची झेप मर्यादित चादरीला अपेक्षित मार्केट मिळत नसल्याने चादर उत्पादक टेरिटॉवेलच्या उत्पादनाकडे वळले. कोरोनापूर्वीपर्यंत टेरिटॉवेलची झेप खूप मोठी होती. त्यानंतर चायनीजच्या मॅनमेड (कृत्रिम धाग्याचा वापर) टॉवेल्समुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली. तरीही टॉवेल एक्स्पोर्टची उलाढाल६०० ते ७०० कोटींची आहे.
शिवाय तामिळनाडू, तसेच हरयाणामध्येही मोठ्या प्रमाणात टॉवेल्सचे (मॅनमेड) उत्पादन सुरू आहे. याचेही आव्हान सोलापूरच्या उद्योजकांसमोर आहे. भविष्यात उद्योग-व्यवसायांत टिकून राहण्यासाठी टॉवेल उत्पादकही गारमेंट निर्मितीच्या संधी ओळखून स्कूल युनिफॉर्मचे उत्पादन घेत आहेत.
बाजारात वॉशेबल प्लास्टिकच्या चटई उपलब्ध आहेत. हलक्या वजनाच्या, तसेच कमी किमतीच्या बेडशीट उपलब्ध आहेत. यामुळे सोलापुरी चादरीचे अस्तित्व संपत आहे. पानिपतचे उद्योजक सोलापूरच्या नावाने बनावट चादरी विकतात. पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ
सोलापूर चादरीचे ‘पानिपत’ : टेरिटॉवेलची होतेय निर्यात७०० ते ८०० कोटींचीवार्षिक उलाढाल याआधी होत असे.६० ते ७० कोटींचीवार्षिक उलाढाल आता होत आहे.९०% सोलापूर चादरीचेअस्तित्व संपुष्टात.भौगोलिक मानांकन अर्थात जीआय प्राप्त सोलापुरी ‘चादरी’चे कुशल कारागीर पूर्वी २५ हजारांहून अधिक होते. आता ही संख्या तीन हजारांवर आली आहे.