शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी टॅग लावून ‘गंगी’चा ३१,८०० किलोमीटर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:30 IST

एका पक्ष्याने चक्क ३१ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये युरोप, रशिया, कझाकिस्तान येथून स्थलांतर करीत सोलापुरात ‘भोवत्या’ हा पक्षी येत असतो.

- यशवंत सादूल सोलापूर :  एका पक्ष्याने चक्क ३१ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये युरोप, रशिया, कझाकिस्तान येथून स्थलांतर करीत सोलापुरात ‘भोवत्या’ हा पक्षी येत असतो. या पक्ष्याचा अभ्यास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘गंगी’ या माँट्युग्यू भोवत्या पक्ष्याला सोलापुरात टॅग लावण्यात आला होता.  चार वर्षांत ‘भोवत्या’ पक्ष्याने सोलापूर ते कझाकिस्तान असा एकूण ३१ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दरम्यान हा पक्षी चौथ्यांदा सोलापूर जिल्ह्यातील गंगेवाडी येथे परतला. स्थलांतर करणाऱ्या भोवत्या पक्ष्याचा शास्त्रीयददृष्ट्या अभ्यास करण्यासाठी बंगळुरू येथील ‘एट्री’ व सोलापुरातील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलने पुढाकार घेतला आहे. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावणारे भोवत्या किंवा हरीण पक्ष्यांचे थवे हे सोलापुरात दिसतात. कझाकिस्तानहून निघालेले हे पक्षी भारतात राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रातील नाशिक आणि सोलापुरात येतात. पुढे दक्षिणेकडील राज्यात जाताना जास्त काळ येथे मुक्कामी असतात. ३१ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या पक्ष्याचे छायाचित्र पक्षिमित्र नागेश राव यांनी टॅगसह काढले आहे. एट्री संस्थेच्या पक्षितज्ज्ञांनी मागील आठवड्यात अशा तीन पक्ष्यांना जीएसएम सोलार टॅग लावून नान्नज पक्षी अभयारण्य परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ४,५००  किलोमीटरचा  प्रवास करून  पिल्लाने  गाठले सोलापूर पक्षी अभ्यासकांनी यंदा सोलापुरातून तीन पक्ष्यांना टॅग लावले असून, दोन वयस्क आहेत. तिसरे नऊ महिन्यांचे पिल्लू आहे. त्याने साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर गाठले आहे.या पक्ष्यांना ‘भोवत्या’ किंवा ‘हरीण’ का म्हणतात? पॅलिड हॅरिअर या परदेशी पक्ष्याचे नाव त्याच्या विहारावरून ठरले आहे. हा पक्षी आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवतीच सारखा घिरट्या मारत असतो, म्हणून त्याला ‘भोवत्या’ म्हणतात. गवताळ माळरानातील सावज हेरून हरणाच्या चपळतेने, सफाईदारपणे शिकार करण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ‘हरीण’ असेही म्हणतात.

टॅग्स :Solapurसोलापूरwildlifeवन्यजीव