शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सांगोला सराफ चोरी प्रकरणी झारखंडची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ७.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:47 AM

सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील आठवड्यात या प्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन यात सहभागी असलेल्या अन्य दोघांना झारखंड येथून ताब्यात घेऊन २४ नोव्हेंबर रोजी अटक केली. या टोळीतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. ओंकार ज्वेलरी शॉप दुकान चोरी प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेऊन खिदीर चौधरी शेख (वय ३४,रा.मानसिंगा पोस्ट झारखंड), आयाज शफी मन्सुरी (वय ३०,रा. सिरीन अपार्टमेंट, जि. ठाणे) या दोघांना ताब्यात घेऊन १ किलो चांदी व एक कार असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.  त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सांगोला पोलीस ठाण्याचे मिळून एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने झारखंड येथे जाऊन आरोपी आलमगीर जब्बार शेख (वय ३२,रा.झारखंड), चांदी विकत घेणारा सतनकुमार रामदेव साह (रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी सतन याच्याकडून पोलिसांनी ३ लाख रुपयांची चांदी जप्त केली.  पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विजय कुंभार, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विभुते, शहाजी सावंत, पोलीस हवालदार लतीफ मुजावर, पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोकॉ शिवाजी काळे,पोलीस हवालदार गोरक्षनाथ गांगुर्डे, सागर शिंदे आदीनी ही कामगिरी केली------------------अशी केली होती चोरीझारखंडच्या टोळीने आेंकार ज्वेलरी दुकानाच्या मागील भिंतीस भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तिजोरी गॅस कटरने कट करुन १६ किलो चांदीने दागिने घेऊन पसार झाले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोर