कर्नाटकच्या बसमध्ये महिलेच्या बॅगेतील दीड लाखाचे दागिने लंपास
By संताजी शिंदे | Updated: February 27, 2024 17:13 IST2024-02-27T17:12:53+5:302024-02-27T17:13:34+5:30
सोलापूरात आल्यानंतर सात रस्ता ते रेल्वे स्टेशन दरम्यान जात असताना, दरम्यानच्या काळात दोन महिला या बसमध्ये चढल्या.

कर्नाटकच्या बसमध्ये महिलेच्या बॅगेतील दीड लाखाचे दागिने लंपास
सोलापूर : कर्नाटकच्या एस.टी. बसमधून इंडी ते सोलापूर असा प्रवास करीत असताना महिला प्रवाशाच्या बॅगेतील एक लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही चोरी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४५ ते २ वाजण्याच्या दरम्यान झाली.
अनुष्का स्वप्निल जाधव (वय ३४ रा. कात्रज पूर्व बदलापूर जि. ठाणे) या महिला प्रवाशी इंडिहून सोलापूरला येत होत्या. त्या सोलापूरात आल्यानंतर सात रस्ता ते रेल्वे स्टेशन दरम्यान जात असताना, दरम्यानच्या काळात दोन महिला या बसमध्ये चढल्या. त्या त्यांच्या बाजूला बसल्या. सात रस्ता ते रेल्वे स्टेशन दरम्यान महिलांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्या बॅगेची चैन उघडली. आतील पर्समध्ये हात घातला व त्यातील सोन्याचे गंठण, रोख रक्कम, काळ्या रंगाचा रेडमी मोबाईल असा एकूण एक लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात दोन महिला चोरट्यांविरूद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.