धक्कादायक! मंगळवेढ्याजवळ जीपचा अपघात; हायवेवर काम करणारे दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2024 18:10 IST2024-03-06T18:08:45+5:302024-03-06T18:10:18+5:30
सायंकाळी पाच वाजता मंगळवेढाजवळ घडला.

धक्कादायक! मंगळवेढ्याजवळ जीपचा अपघात; हायवेवर काम करणारे दोघे ठार
मल्लिकार्जुन देशमुखे, मंगळवेढा: सोलापूरकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या बोलोरो गाडीने हायवेवर रस्त्याच्या डागडुजीचे काम करणाऱ्या दोन कामगारांना जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले. बोलोरो गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता मंगळवेढाजवळ घडला.
मंगळवेढा- सोलापूर महामार्गावर मंगळवेढा पासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. ही कामे मध्यप्रदेश मधील कामगार करत होते. त्यानिमित्ताने प्लस्टिक बॅरिकेट लावले होते. सोलापूरकडून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेल्या एम. एच ०९ जी एम २०६१ या बोलोरो गाडीने बॅरिकेट तोडून काम करणाऱ्या कामगारांना उडविले यामध्ये दोन कामगार दूरवर फरफटत जाऊन जागीच ठार झाले. जीपगाडी रस्त्यापासून २५ ते ३० फुटापर्यंत फेकली गेली. यामध्ये दोघेजण होते. यातील महिला गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताच्या १५ मिनीटापूर्वी हे दोन काम मंगळवेढा येथून पाणी पिऊन कामावर गेले होते अशी माहिती डीबीएलचे कर्मचारी गणेश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांनी घटनास्थळी भेट दिली .