शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जवान नागप्पा म्हेत्रे यांच्यावर श्रीनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:28 IST

हुलजंतीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप; कुटुंबियांनी व्हिडिओ कॉलिंगव्दारे घेतले अंतिम दर्शन

ठळक मुद्देसोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करतेवेळी व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन घडविलेआता आपल्या नागप्पा चा चेहरा आपल्याला कधीच दिसणार नाही असे म्हणत पत्नी, आई, भाऊ, बहीण, चिमुकलीसह सर्वांनी आक्रोश केलागावकरी जवान नागप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने जमले होते

मंगळवेढा : श्रीनगर येथील दुर्गम भागात कर्तव्यास असणाºया मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे ह्रदयविकाराने व कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीनगर येथे  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागप्पाचे अखेर दर्शन घेण्यासाठी जमलेल्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

जवान नागप्पा हे लॉकडाऊननंतर २४ जून रोजी हुलजंतीमधून श्रीनगर येथे कर्तव्यावर निघाले होते, प्रारंभी ते दिल्ली येथे १४ दिवस व श्रीनगर येथे लेटपूरा येथे १४ दिवस क्वारंटाईन सेंटर मध्ये क्वारंटाईन झाले होते. या दरम्यान १८ जुलै रोजी जवानांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्याचा क्वारंटाईन कालावधी दि २५ ला संपून ते २६ जुलै ला सेवेवर जाणार होत, तत्पूर्वी त्यांना शनिवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान छातीत दुखू लागल्याने तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. पोस्टमार्टेम करण्यापूर्वी स्वॅब घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेतली असता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला़ त्यानंतर लष्कर अधिकाºयांनी कुटुंबीयांना कोरोना चाचणी मध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पार्थिव तिकडे पाठवता येत नाही तरी येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी द्या असे सांगितले, मात्र कुटुंबियांनी परवानगीसाठी नकार दिला ह्रदयविकाराच्या झटका आल्याचा रिपोर्ट व कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवा असे कुटुंबिय म्हणत होते, त्यावेळी कोरोना रिपोर्ट दाखवण्यात आला यावर कुटुंबियांचा विश्वास नव्हता.

रविवारी रात्री तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी म्हेत्रे कुटुंबियांचा लष्कर अधिकारी यांच्याशी संवाद साधला़ सोमवारी अंत्यसंस्कार करतेवेळी जवान नागप्पा यांचे मुखदर्शन घडवून अंत्यसंस्कार करण्याचे ठरले, त्याप्रमाणे सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करतेवेळी व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन घडविले. आता आपल्या नागप्पा चा चेहरा आपल्याला कधीच दिसणार नाही असे म्हणत पत्नी, आई, भाऊ, बहीण, चिमुकलीसह सर्वांनी आक्रोश केला. यावेळी गावकरी जवान नागप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने जमले होते़ दरम्यान आ़ भारत भालके, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी  म्हेत्रे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीरDeathमृत्यू