सोलापुरात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट

By appasaheb.patil | Published: March 22, 2020 06:33 AM2020-03-22T06:33:20+5:302020-03-22T06:44:58+5:30

गर्दी टाळूया...कोरोनाला हरवूया; व्यायाम मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या सोलापूरकरांनी घराबाहेर येणे टाळलं

'Janata curfew' started in Solapur from 6am onwards. | सोलापुरात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट

सोलापुरात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज सोलापूर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यूलोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनाने केलं आवाहन

सोलापूर : कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सोलापूर शहरात सकाळी सहा वाजताच सुरुवात झाली. सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर, उद्यानात होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे सोलापूर शहरात सकाळी सहा वाजल्यापासूनच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. 
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कालपासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे सोलापूर शहरे आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही. 

कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे.

Web Title: 'Janata curfew' started in Solapur from 6am onwards.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.