उन्हाळा आहे... 'एसी'साठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत पत्नीचा छळ!
By रवींद्र देशमुख | Updated: June 1, 2023 16:50 IST2023-06-01T16:48:03+5:302023-06-01T16:50:22+5:30
मनाली यांचा अनिल गायकवाड याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता.

उन्हाळा आहे... 'एसी'साठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत पत्नीचा छळ!
सोलापूर : उन्हाळा चालू आहे, घरात एसी बसवण्यासाठी तुझ्या वडिलाकडून पैसे घेऊन ये, म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मनाली अनिल गायकवाड ( वय २७, रा. संजय नगर, कुमठा नाका) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनाली यांचा अनिल गायकवाड याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर पती अनिल व त्याच्या घरातील मंडळी हे मनाली यांना मोलकरणी सारखी वागणूक देत होते. उन्हाळा आहे, घरात एसी बसवण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणत मानसिक त्रास देत होते. शिवाय लग्नामध्ये तीन तोळे सोने राहिले होते ते घेऊन ये नाहीतर तीन लाख रुपये घेऊन ये अन्यथा तुला नांदवणार नाही म्हणत त्रास देत होते. शिवीगाळ करत होते.. मनाली यांनी फिर्यादीत हे नमूद केले आहे.
यावरून पती अनिल गायकवाड, सुवर्णलता शिवाजी गायकवाड, शिवाजी सोपान गायकवाड, प्रथम गायकवाड ( सर्व रा. गरीबी हटाव झोपडपट्टी, हरळय्या नगर, विजापूर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.