फटाके उडवून रात्री चौकात वाढदिवस साजरा करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST2021-09-16T04:29:08+5:302021-09-16T04:29:08+5:30

बार्शी : कोरोनाचा संसर्ग असताना बार्शीत भोसले चौकात टेबल टाकून फटाके उडवून वाढदिवस साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

It was expensive to celebrate a birthday in the night square by blowing up firecrackers | फटाके उडवून रात्री चौकात वाढदिवस साजरा करणे पडले महागात

फटाके उडवून रात्री चौकात वाढदिवस साजरा करणे पडले महागात

बार्शी : कोरोनाचा संसर्ग असताना बार्शीत भोसले चौकात टेबल टाकून फटाके उडवून वाढदिवस साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. याबाबत जवाहर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार (२५, रा. राऊत चाळ, बार्शी) व चंद्रकांत पवार यांच्यासह २५ जणांविरुद्ध सहाय्यक फौजदार बाळासाहेब नाईकनवरे यांनी फिर्याद दिली आहे.

सध्या गणेशोत्सव काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. या चौकातील जवाहर गणेश मंडळासमोर कोणाचा तरी वाढदिवस साजरा सुरु होता. गस्तीवरील पोलीस इकडे वळले आणि चौकशी करताना मास्क न लावता फटाक्यांची आतषबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.

Web Title: It was expensive to celebrate a birthday in the night square by blowing up firecrackers