शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

५२ हजार गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेला लागले सलग २८ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:10 IST

मंठाळकर खाणीत गणरायाला निरोप : मंगळवारी सकाळी ९ पासून बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते काम

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्र्तींना सोलापूरकरांनी पसंती दिलीजुळे सोलापुरातील अनिल कोकाटे यांनी पाण्यामध्ये मूर्तीच्या वजनाइतका सोडा टाकून विसर्जन केलेयावेळी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन पूजा झाली

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील शेकडो गणेशभक्तांनी यंदा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याचे मंगळवारी दिसून आले. विशेष म्हणजे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजकांनी आपल्या घरातील गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने मंठाळकर खाणीमध्ये सुमारे ५२ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले.

शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम, त्यांचे पती रमेश यन्नम यांनी मंगळवारी सकाळी आपल्या घरी गणेश विसर्जन केले. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही घरीच विसर्जन केले. मनपाच्या वतीने मूर्ती संकलनासाठी आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून १०९ संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. 

अनेक गणेशभक्तांनी या ठिकाणी गणेशमूर्ती सुपूर्द केल्या. मंठाळकर खाणीमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून मनपा कर्मचारी गणेश विसर्जन करीत होते. महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगर अभियंता संदीप कारंजे आदींनी या ठिकाणी भेट दिली.

पीओपीच्या मूर्तीचेही घरीच विसर्जन..यंदाच्या वर्षी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्र्तींना सोलापूरकरांनी पसंती दिली. त्यामुळे घरीच श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करता आले. पण, असेही अनेक जण होते ज्यांना शाडूची मूर्ती मिळाली नाही, त्यांनी आपल्या पीओपीच्या मूर्तीदेखील घरीच विसर्जित केल्या. जुळे सोलापुरातील अनिल कोकाटे यांनी पाण्यामध्ये मूर्तीच्या वजनाइतका सोडा टाकून विसर्जन केले. यावेळी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन पूजा झाली. 

पोलिसांचा पहाराप्रशासनाने तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यामुळे धर्मवीर संभाजी तलाव परिसरात पोलीस तैनात करण्यात आले. तीन ठिकाणी तंबू मारून पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. अगदी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत तलाव परिसरात पोलिसांचा पहारा होता. तलावाच्या बॅकवॉटर परिसरात (सैनिक नगरच्या मागील बाजूस) देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही अपवाद वगळता तिथे मूर्ती विसर्जनासाठी कुणी आले नाही. जे काही लोक आले होते ते परतले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव