शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Interview ; करमाळा विधानसभाच माझे टार्गेट; युतीत नाही जमले तर अपक्ष : संजय शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:33 IST

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची नुसती चर्चा सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाकडे अद्याप उमेदवारी मागितलेली नाही. करमाळा विधानसभा ...

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे संजय शिंदे यांचे नाव चर्चेतकरमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे माझे टार्गेट - संजय शिंदेमी अजून उमेदवारी मागण्यास कोणाकडे गेलेलो नाही - संजय शिंदे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची नुसती चर्चा सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाकडे अद्याप उमेदवारी मागितलेली नाही. करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे माझे टार्गेट असून, यासाठी कोणाबरोबर जायचे हे अद्याप ठरविलेले नाही; पण युतीत नाही जमले तर अपक्ष लढण्याचे तयारी असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले. 

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे संजय शिंदे यांचे नाव चर्चेत असल्याबाबत  त्यांना विचारले असता, त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजप पुरस्कृत मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. या दिवसापासून मला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आग्रह धरला जात आहे. पण यात लोकसभा असे म्हटलेले नव्हते. सध्या जी चर्चा सुरू आहे, ती भाजप पातळीवर असू शकेल, पण मी अजून उमेदवारी मागण्यास कोणाकडे गेलेलो नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या काळात माझी भेट झालेली नाही. ते सोलापूर दौºयावर आल्यावरच एकदा भेटलो होतो. माझं टार्गेट विधानसभा आहे. त्यादृष्टीनेच मी गेल्या चार वर्षांपासून तयारी करीत आहे. भाजप-सेना युती झाली तर करमाळ्याची जागा सेनेच्या वाट्याला जाणार आहे. सध्या कोणत्याही पक्षाचे आघाडीबाबत स्टॅण्ड झालेले नाही. हे एकदा स्टॅण्ड झाले की मग कोणाबरोबर जायचे हे मी ठरविणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

मागील वेळेस महाआघाडीतर्फे निवडणूक लढविली होती, या वेळेस कसे असे विचारले असता शिंदे म्हणाले की, सदाभाऊ खोत सध्या भाजपबरोबर आहेत. मी विधानसभेसाठी इच्छुक असल्याने महादेव जानकर यांनी रासपतर्फे निवडणूक लढविण्याची आॅफर यापूर्वीच दिली आहे. युती, आघाडीत जागा मिळाली नाही तर मी अपक्ष लढणार आहे. 

शरद पवार माढ्यात लढू शकतात!गेल्या आठवड्यात प्रभाकर देशमुख माझ्याकडे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुमची आठवण काढली होती, असे सांगतानाच माढा लोकसभेसाठी माझी शिफारस करा, असे ते म्हणाले होते. राष्ट्रवादीतर्फे अनेकांची चर्चा असून, एखाद्वेळेस शरद पवार हे स्वत:च या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संजय शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाSharad Pawarशरद पवार