मुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:39 AM2018-10-12T10:39:36+5:302018-10-12T10:42:46+5:30

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि बाह्य रोगांचे आक्रमण

Interview; Arthritis Risks at Any Age - Dr. Mukund Rai | मुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय

मुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय

Next
ठळक मुद्देबदलत्या जीवनशैलीमुळे व आहारातील बदलामुळे सगळे जीवनचक्रच बदललेआपल्या शरिराला व्यायामाची सवय नसेल तर स्नायू कमजोर होऊन सांध्यावर दबाव येतोमुळात हा आजार एका आजाराशी निगडीत नसून शरिरीतील हाडांच्या बळकटीशी निगडित आहे

बाळासाहेब बोचरे 

सोलापूर : वयोमानानुसार  सांध्यांची झीज होऊन सांधे दुखतात. तरुण वयात व वृध्दपणातही सूज येणाºया संधीवाताचे आजार  होण्याचा धोका आता वाढला आहे. व्यायामाचा अभाव आणि  नवनवीन आजारामुळे त्याचा सांध्यावर होणारा परिणाम  हा कोणत्याही वयात होतो आणि संधीवाताचा आजार बळावतो, असे सोलापुरातील ख्यातनाम फिजीशियन संधिवात आजाराविषयी प्रक्षिशित डॉ. मुकुंद राय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आज जागतिक संधीवात दिनाच्या पार्श्वभूमीवर याबाबत त्याच्याशी सविस्तर केलेली बातचीत.

प्रश्न : संधीवात हा आजार वृध्दापकाळातच जाणवतो हे खरे का?
डॉ. राय- तसे काही नाही. वृध्दापकाळात  होणारा संधीवात हा सांध्यामध्ये निर्माण झालेल्या झीजेमुळे होतो. पण कमी वयात सांध्यावर आक्रमण करणारे अनेक घटक वातावरणात आहेत. जसे की अलिकडे चिकनगुन्या सारखे आजार सांध्यांवर आक्रमण करतात. ताप आणि सांध्यामध्ये सूज आल्याने अशा आजारावर वेळीच उपचार न केले तर सांधे निकामी होण्याचा धोका उद्भवतो.  

प्रश्न: संधीवाताचा धोका कधी ओळखावा
डॉ. राय: सर्वात जास्त प्रमाणात लक्ष वेधून घेणारा व लवकर इलाज करणे आवश्यक असणारा प्रकार म्हणजे सूज आणणारे प्रकार.  या आजारात सांध्यामध्ये दाह निर्माण होऊन सांधे खराब होतात व व्यंग निर्माण होऊन सांधे कायमचे निकामी होऊ शकतात. राञी सांधे दुखणे.. त्यामुळे झोप न लागणे,सकाळी उठताना सांधे बराच काळ आखडलेले असणे, रोजची कामे करताना ञास होणे, ही या सूज संधिवाताची लक्षणे आहेत. त्याकडे गांभीर्यानेलक्ष दिले पाहिजे. 
व वेळीच इलाज करणे आवश्यक असते. ही सांध्यामधील सूज आपल्या पूर्ण शरीरातील अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकते.

प्रश्न: यावरील औषधांचे दुष्परिणाम होतात का? 
डॉ. राय: शरिराच्या व आजाराच्या आवश्यकतेनुसारच औषधे घेतलेली बरी. आणि हे समजण्यासाठी वेळो वेळी डॉक्टरांकडून चाचण्या करुन घेणे आवश्यक असते. उगीच औषधांचा अतिरेक  होणार नाही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच उत्तम ठरते. 

प्रश्न: सांधेदुखी होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी.
डॉ. राय: मुळात हा आजार एका आजाराशी निगडीत नसून शरिरीतील हाडांच्या बळकटीशी निगडित आहे. आज अनेक आजार आहेत की ते हाडांवर व सांध्यावर परिणाम करतात.  ज्या त्या आजाराची वेळच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. १६ वषार्खालील मुले, गरोदर स्त्रिया, यांनी हाडांच्या बळकटीसाठी चौरस आहार घेणे आणि स्रायू व सांध्यांची हालचाल  करणे आवश्यक असते. मी परत एकदा सांगू इच्छितो की साधी सांधेदुखी वेगळी व सूज येऊन नुकसान करणारा संधिवात वेगळा. 

प्रश्न: सांधेदुखीवर घरगुती उपाय केले जातात ते योग्य आहे का? 
डॉ. रॉय: घरगुती उपचारामुळे कोणाला आराम मिळाला असेल पण मूळ आजार तसाच राहिलेला असतो. त्यामुळे तो तात्पुरता उपाय ठरू शकतो कायमचा नव्हे.


अल्पवयात का उद्भवतो संधीवात?
- बदलत्या जीवनशैलीमुळे व आहारातील बदलामुळे सगळे जीवनचक्रच बदलले आहे. आपल्या मूळ शरीररचना किंवा उपजत जनुकीय दोषाला पर्यावरणातील काही घटक  खतपाणी घालतात आणि  संधिवाताची सुरुवात होते. आपल्या शरिराला व्यायामाची सवय नसेल तर स्नायू कमजोर होऊन सांध्यावर दबाव येतो.त्यामुळे सांधेदुखी होते सकस आहाराअभावी शरिरामध्ये ड जीवनसत्वाची व इतर घटकांची कमतरता असेल तर हाडाचे व सांध्यांचे रोग होण्याचा संभव असल्याचे डॉ. मुकुंद  रॉय यांनी स्पष्ट केले.

Web Title: Interview; Arthritis Risks at Any Age - Dr. Mukund Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.