शिरगाव येथे आज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पधा
By Admin | Updated: August 26, 2014 23:54 IST2014-08-26T23:50:29+5:302014-08-26T23:54:50+5:30
चार लाखांची बक्षिसे : बसवेश्वर यात्रेचे आयोजनर्

शिरगाव येथे आज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पधा
निपाणी : शिरगाव (ता. चिकोडी) येथील ग्रामदैवत बसवेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त उद्या, बुधवारी आंतरराष्ट्रीय नामांकित मल्लांच्या भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे. विजेत्यांना चार लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी आंतरराष्ट्रीय पैलवान सत्येंद्र हरियाणा आणि उपमहाराष्ट्र केसरी सुनील साळुंखे यांच्यात होणार आहे. त्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार आणि लोप्रीतसिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे. त्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान गुरुसेवकसिंग, पंजाब आणि कार्तिक दावणगेरे यांच्यात होत असून, विजेत्यांना ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पैलवान सिद्धाप्पा गुलबर्गा-जमखंडी आणि आनंद लमाणी-दावणगिरी यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी लढत होणार असून, विजयी पैलवानाला ३० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती नागप्रसाद- धारवाड आणि नीरजकुमार- पंजाब यांच्यात होणार आहे.
याशिवाय पैलवान कृष्णा-बागलकोट, यल्लाप्पा कोणी, विशाल- कोल्हापूर, आप्पासाहेब इंगळगी, रूपेश इंडी, केंपाण्णा तोरणहळ्ळी, अनिल उमराणी, संजय जमखंडी, सतीश सूर्यवंशी, गोपाल सुलतानपूर, शिवाजी अथणी, शिवानंद निरवानट्टी, लोकाप्पा चिम्मट, श्रीधर रायबाग यांच्यात चटकदार कुस्त्या होणार आहेत. (प्रतिनिधी)