ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 7, 2023 18:23 IST2023-04-07T18:23:12+5:302023-04-07T18:23:23+5:30
गुरुवारी गारमेंट उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत फॅन्सी गारमेंट फेअर घेण्याची सूचना सर्वांनी केली.

ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापूर गारमेंट असोसिएशनकडून ऑगस्ट २०२३ मध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर घेण्यात येणार आहे. यात मनपसंत इंद्रधनू रंगांच्या शर्ट्स ॲन्ड पॅन्टी, मेन्स तसेच वूमन फॅन्सी वेअर बघायला मिळतील. आंतरराष्ट्रीय गारमेंट युनिफॉर्म फेअरच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदा फॅन्सी गारमेंट फेअरची तयारी सुरू असल्याची माहिती फेअर समितीचे अध्यक्ष शैलेंद्र घनाते तसेच सचिव विनायक माळगे यांनी दिली.
गुरुवारी गारमेंट उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत फॅन्सी गारमेंट फेअर घेण्याची सूचना सर्वांनी केली. त्यानुसार ऑगस्ट मध्ये फेअर आयोजिला आहे. या फेअरसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. गारमेंट असोसिएशनने आतापर्यंत पाचवेळा आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म गारमेंट फेअर घेतला असून, याच पार्श्वभूमीवर फॅन्सी गारमेंट फेअर घेण्यात येणार आहे. यात फॅन्सी गारमेंट उद्योजक सहभाग घेतील. कापडपासून ते तयार फॅन्सी कपड्यांचे प्रदर्शन यात असणार आहे. नवीन मार्केट शोधण्यासाठी फेअर आयोजित करणे गरजेचे आहे. ऑगस्टनंतर ७०० आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन डिसेंबर २०२३ला वाराणसी येथे होणार आहे.