Pandharpur Double Murder: पंढरपुरातील १५ जुलै रोजी झालेल्या मयत लखन संजय जगताप यावर अंदाजे १६ वार केले होते. पहिलाच वार एवढा भयानक होता, यामुळे लखनला आवाज करता आला नाही. या खुनानंतर संशयित आरोपी विशाल शिंदे नाईक बाहेर येताच, लखनची आई सुरेखा यांनी विशालला ओळखले. यामुळे त्याने त्यांच्या तोंडावर देखील वार केले. त्यानंतर मागून आरोपीने वार केले. हे दोन खून अवघ्या १० मिनिटात झाल्याची माहिती सहा. पोलीस अधिक्षक डॉ. प्रशांत डगळे यांनी दिली.
खुनासाठी विशालने घरातील गवत कापायच्या मशीनचे पाते काढून त्याने हत्यार तयार केले. सुरेखा संजय जगताप (वय ५५) व यांचा मुलगा लखन संजय जगताप (वय २५) हे घरी असताना १५ जुलै (मंगळवारी) रोजी रात्री अचानक कोणीतरी घरात घुसले. त्या अज्ञात व्यक्तीने माय-लेकाची शस्त्राने वार करून हत्या केली
या घटनेच्या तपासासाठी सोलापूर, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका आदी ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आठ पथके नेमली. पंढरपूर शहरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण पाहून संशयितांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या परिसरात त्या दिवशी असलेल्या मोबाईल टॉवरच्या नजीकच्या लोकेशन नुसार संबंधित व्यक्तींना देखील पोलिस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी करीत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत डगळे यांनी तपासाची सूत्रे १६ जानेवारी रोजी हातात घेतली. पोनि. दशरथ वाघमोडे, सपोफौ शरद कदम व पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज हेंबाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरु केला.
संशयित आरोपी विशाल शिंदे नाईक याचा घटनेच्या वेळी ६० मिनिट फोन बंद होता. गुन्हा घडण्याच्या पूर्वी विशाल शिंदे याचा अर्थव शिंदे नाईक त्याच्याबरोबर ११ सेकंद फोनवर बोलला होता. याचा धागादोरा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. त्या दोघांना मदत करणाऱ्या विधी संघर्ष बालकाकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून गुप्तचर पेरला. त्या गुप्तचर व्यक्तीला पोलिसांनी बक्षीस देण्याचे आमिष देऊन त्या विधीसंघर्ष बालकाजवळ पाठवले. त्या बालकाला पार्टी देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्याने घटनेबाबत माहीती सांगताच, त्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली.
गुन्हा घडल्याच्या दोन महिन्यांनंतर अर्थव हा राजस्थान येथे जोधपूर येथे बहिणीकडे गेला. त्याठिकाणी तो सोन्याच्या अटणीच्या दुकानात काम करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विशालच्या सांगण्यावरून खुनाची कबुली दिली. तसेच तपास चुकीच्या दिशेने जावा यासाठी घरातील टीव्ही व अन्य साहित्य नेऊन नदीपात्राजवळ टाकले. त्याचबरोबर विशाल शिंदे यानेच ११२ ला फोन करून घटना कळविल्याचे सांगितले.
आरोपीला दोन वेळा आणले परंतु दिले होते सोडून
खून झाल्यानंतर विशाल शिंदे नाईक व अर्थव शिंदे नाईक या दोघांना दोनवेळा चौकशीसाठी बोलावले. परंतु त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले होते. त्यामुळे पुराव्याअभावी पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते.
सोशल मीडियावर मॅसेजमुळे आरोपी आला अडचणीत
अर्थव शिंदे यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यावेळी इन्स्टाग्रामवर चार खाते होते. त्यातील दोन खाते हाईड केली होते. फेक अकाऊंट वर त्याने सोशल मीडियावर सच्चाई छुपाई गई है, अफवाह उडाई गई, कहाणी कुछ और थी, सुनाई कुछ और गई.. ही पोस्ट व्हायरल केली. त्यावरून पोलिसांचा अधिक संशय बळावला.
१२०० लोकांची लोकेशन तपास...
खून झालेल्या परिसरातील मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असणाऱ्या १२०० लोकांचे लोकेशन तपासून त्यांची चौकशी केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून देखील ३०० च्या आसपास लोकांना पोलिस ठाण्यात बोलवून चौकशी केली होती. यातून सपोफौ कदम व पोहेकों सुरज हॅबाडे यांनी वरील लोकांचे नंबर फिल्टर करून २०० ची तपासणी सुरू केली. त्यानंतर त्यांना धागेदोरे हाती लागले.
Web Summary : Police solved the Pandharpur double murder, arresting Vishal Shinde. Initially released due to false witnesses, suspicion grew after a social media post. Investigation of phone records and tower locations helped reveal the crime.
Web Summary : पंढरपुर दोहरा हत्याकांड पुलिस ने सुलझाया, विशाल शिंदे गिरफ्तार। झूठे गवाहों के कारण शुरू में रिहा, सोशल मीडिया पोस्ट के बाद संदेह बढ़ा। फोन रिकॉर्ड और टावर लोकेशन की जाँच से अपराध का खुलासा हुआ।