शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भाजप नगरसेवक सुनील कामाठीच्या अटकेनंतर यादीतल्या लोकांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:52 AM

सोलापुरातील मटका प्रकरण; पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

ठळक मुद्देसुनील कामाठीवर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता?सुनील कामाठीच्या पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर : तब्बल २९ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मटकाकिंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याला अटक झाल्यानंतर त्याच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या नावांची चौकशी होणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोंचीकोरवी गल्लीतील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर मुख्य सूत्रधार सुनील कामाठी याच्या घराची झडती घेण्यात आली होती. घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये इतर नोंदवह्यांबरोबर एक हिशोबाची वही आढळून आली आहे. हिशोब वहीमध्ये जेलरोड पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिमहिना कोणाला किती पैशाचे वाटप केले जात होते, याची नोंद असल्याचे समजते. बीट मार्शलपासून अधिकाºयांपर्यंत १६० लोकांच्या नावांची यादी असल्याचे समजते. प्रत्येक महिन्याला ५० ते ६० लाख रुपयांचे वाटप केल्याच्या नोंदी हिशोबाच्या वहीमध्ये असल्याचे विश्­वसनीय सूत्रांकडून समजते. नोंदवहीमधील नावे सांकेतिक भाषेत लिहिण्यात आलेली आहेत. ही नावे कोणाची आहेत याची माहिती दस्तुरखुद्द सुनील कामाठी याच्याकडून घेतली जाणार आहे. 

सुनील कामाठीवर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता?नगरसेवक सुनील कामाठी याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. शिवाय मटकाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचा नगरसेवक म्हणून समाजसेवेचा बुरखा पांघरून फिरणाºया नगरसेवक सुनील कामाठी याच्यावर पोलीस आयुक्तालयाकडून आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे, असे समजते. शहरातील मोठ्या राजकीय नेत्यांमार्फत ही कारवाई होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे कारवाई करणार यात कसलीही शंका नाही, असेही बोलले जात आहे. 

सुनील कामाठीच्या पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडीमटक्यातील व्यवहार पाहणाºया नगरसेवक सुनील कामाठी याच्या पत्नी सुनीता कामाठी व मटक्याच्या कामात सहकार्य करणाºया हुसेन तोनशाळा या दोघांनाही गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांच्यासमोर उभे केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी आरोपीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड. श्रीकांत पवार तर सरकारतर्फे अ‍ॅड. करवते हे काम पाहत आहेत. 

गोरगरीब, हातावर पोट असणाºया कष्टकºयांच्या श्रमाचा पैसा मटक्­यामध्ये लावला जातो. या पैशावर मटका एजंट, मटका बुकी व मटका चालक, मालक गडगंज होतात. मटका या जुगाराला सहकार्य करणाºयाची माहिती घेतली जात आहे. पोलीस कर्मचारी असो किंवा अन्य कोणी, कोणाचीही गय केली जाणार नाही. - अंकुश शिंदे पोलीस आयुक्त.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसBJPभाजपा