शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 17:23 IST

Ajit Pawar talk on Sachin Vaze's Letter alligation: सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती.

पंढरपूर -  सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत,  या प्रकरणी माझी कोणतीही  चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळेंच्या फार्महाऊसवर स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासा हा केला.

यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला  मी कधीही भेटलो नाही.  माझे वाझेशी कधी  संभाषण देखील झाले  नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख  करण्याचं काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल.  विरोधकांकडून  जाणूनबुजून महाविकास आघाडीचे  सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्राला  जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी लस  मिळत नाही. सुरवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची  घाई केली पण  ठीक आहे. ती पण आपलीचं भावंड आहेत. आपल्या देशात तयार होणारी लसं आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्या ऐवजी, आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीचं  वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसात लसीकरण संपावायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय  यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगिरथ भालके, उमेश पाटील, उत्तम जानकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूरsachin Vazeसचिन वाझेBJPभाजपाPoliticsराजकारणCorona vaccineकोरोनाची लस