पिंपळगाव धस येथे अर्भक आढळले मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST2021-05-24T04:20:59+5:302021-05-24T04:20:59+5:30
बार्शी : अनैतिक संबंधातून जन्मलेले तीन ते चार महिन्यांचे अर्भक पिंपळगाव धस येथे एका शेतात मृतावस्थेत आढळून आले. ...

पिंपळगाव धस येथे अर्भक आढळले मृतावस्थेत
बार्शी : अनैतिक संबंधातून जन्मलेले तीन ते चार महिन्यांचे अर्भक पिंपळगाव धस येथे एका शेतात मृतावस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी हे अर्भक मृतावस्थेत आढळून आले असून बार्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शेतमालक बापू प्रभाकर वायकर (रा.भोळे वस्ती पिंपळगाव) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. अर्भक आढळल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, हवालदार गोरख भोसले, रफिक शेख, अमोल बकाल, पोलीस हवालदार धनराज केकान व गणेश सुर्यवंशी यांचे पथक वायकर यांच्या शेतात दाखल झाले.
मुलाच्या अंगावर मुंग्या डोकीला खरचटलेले व अंगावर रक्ताचे डाग व नाळ दिसली त्यामुळे त्याचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले . दरम्यान या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.