काळानुरुप बदल करा तरच उद्योग टिकतील, करण शहा यांचे आवाहन, सोलापूरातील अभिजित कदम मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगातील अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:26 IST2018-01-23T14:16:42+5:302018-01-23T14:26:13+5:30

कोणताही उद्योगधंदा फार काळ एकाच ढाच्यात, रुपात राहू शकत नाही़ त्यात काळानुरूप बदल झाले नाही तर ग्राहक त्याला पुढे फारसे स्वीकारत नाहीत़ बदल स्वीकारला तर ग्राहक कायम जोडून राहतील़

Industry will continue, change of time, Karan Shah's appeal, Abhijit Kadam of Solapur students learn about experience in industry | काळानुरुप बदल करा तरच उद्योग टिकतील, करण शहा यांचे आवाहन, सोलापूरातील अभिजित कदम मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगातील अनुभव

काळानुरुप बदल करा तरच उद्योग टिकतील, करण शहा यांचे आवाहन, सोलापूरातील अभिजित कदम मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगातील अनुभव

ठळक मुद्देअमेरिके त पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाला जास्त महत्त्व दिले जाते : करण शहाएखाद्या पुस्तकातील संकल्पना व्यवहारात कशी अंमलात आणली जाते हे बाहेरील विद्यापीठात शिकवले जाते़ : करण शहा


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : कोणताही उद्योगधंदा फार काळ एकाच ढाच्यात, रुपात राहू शकत नाही़ त्यात काळानुरूप बदल झाले नाही तर ग्राहक त्याला पुढे फारसे स्वीकारत नाहीत़ बदल स्वीकारला तर ग्राहक कायम जोडून राहतील़ स्वत:मध्ये कधीच बदल करता आला नाही म्हणून नोकिया कंपनी बंद झाली आणि अ‍ॅपल आज बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनीचे ब्रँड बनल्याचे आवाहन प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे बिझनेस डेव्हलपमेंट व ग्रोथ स्ट्रॅटेजी एक्झिक्युटिव्ह करण शहा यांनी केले़ 
भारती विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसच्या वतीने उद्योगावर आधारित आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ या कार्यक्रमास इन्स्टिट्यूटचे संचालक  डॉ़ व्ही़ एस़ मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़  प्रारंभी त्यांनी शहराबाहेर राहून शिक्षण घेतानाचे आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले़ अमेरिके त पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाला जास्त महत्त्व दिले जात असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला़ एखाद्या पुस्तकातील संकल्पना व्यवहारात कशी अंमलात आणली जाते हे बाहेरील विद्यापीठात शिकवले जाते़ त्याचा पुढे व्यवसाय,  नोकरीसाठी फायदा होतो असे सांगत तरुण उद्योजक सोलापूरला गतवैभव मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली़  या कार्यक्रमास प्रा़ एस़ आऱ हिरेमठ, डॉ़ अविनाश ढवण, प्रा़ आयेशा अलिम, प्रा़ चंद्रकांत सूर्यवंशी, प्रा़ शबनम माने आणि एमबीए, एमसीए आणि बीबीएचे विद्यार्थी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवेज शेख यांनी केले तर आभार योगिता यलगुलवार यांनी मानले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ़ प्रीतम पी़ कोठारी आणि प्रा़ शिवगंगा मैंदर्गी यांनी प्रयत्न केले़ 

Web Title: Industry will continue, change of time, Karan Shah's appeal, Abhijit Kadam of Solapur students learn about experience in industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.