मुलीला पळवून नेल्याची विचारणा करणाऱ्या महिलेशी असभ्य वर्तन
By विलास जळकोटकर | Updated: February 12, 2024 20:46 IST2024-02-12T20:46:09+5:302024-02-12T20:46:29+5:30
या प्रकरणी तपास सपोनि बनसदवडे करीत आहेत.

मुलीला पळवून नेल्याची विचारणा करणाऱ्या महिलेशी असभ्य वर्तन
सोलापूर : ‘मुलीला पळवून नेण्यास मदत केली का?’ अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला उलट तिलाच ‘तुला लई मस्ती आली आहे’ असे म्हणत तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात घडल्याचा गुन्हा रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी हिरामणी रोकडे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची मुलगी घरातून नाहिशी झाल्याने त्यास वरील आरोपीने पळून जाण्यास मदत केल्याचे समजल्याने याबद्दल त्याला विचारणा करण्यासाठी सदर महिला गेली असताना आरोपीने ‘मला एवढेच काम आहे का? असे म्हणाला.
नीट बोला म्हणाल्याने शिवीगाळ करुन झटापट केली. यात सदर फिर्यादी महिलेचा ब्लाऊज फाडून लजास्पद वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास सपोनि बनसदवडे करीत आहेत.