ट्रॅव्हल्समध्ये कॉलेजकुमारीशी अश्लिल वर्तन; तरुणाविरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: May 29, 2023 18:26 IST2023-05-29T18:26:31+5:302023-05-29T18:26:59+5:30
तरुणाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

ट्रॅव्हल्समध्ये कॉलेजकुमारीशी अश्लिल वर्तन; तरुणाविरुद्ध गुन्हा
विलास जळकोटकर, सोलापूर : शैक्षणिक अभ्यासासाठी गेलेल्या कॉलेजकुमार तरुणी ट्रव्हल्समधून परतताना एका प्रवाशानं अंधाराचा गैरफायदा घेऊन अश्लिल वर्तन केले. रविवारच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला टोलनाक्याजवळ खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी अमीर पैगंबर शेख (वय- २३, लोकमान्यनगर, सोलापूर) या तरुणाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
सोलापुरातील एका महाविद्यालयातील तरुण-तरुणी शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी कोल्हापूरला गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून सर्वजण २७ मे रोजी १०:३० रोजी ट्रॅव्हल्समधून सोलापूरकडे परतत होते. बस सांगोला टोलनाक्याजवळ आलेली होती. बसमधील एका अनोळखी तरुणानं एका महाविद्यालयीन तरुणीशी लजास्पद वर्तन केले. यावर ग्रूपमधील सर्व मित्रांनी एकच गोंधळ केला. ट्रॅव्हल्सचालकाला झाला प्रकार सांगितला. ट्रॅव्हल्सचालकाने सोलापुरात बस पोहचताच थेट सदर बझार पोलीस ठाण्यात नेली. येथे पिडित तरुणीने तक्रार नोंदवताच संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करता वरील नाव समजले. संबंधीत प्रकार सांगोला हद्दीत घडल्याने सांगोला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.