बदनामीची धमकी देत विवाहितेशी असभ्य वर्तन; रोमियोविरुद्ध गुन्हा दाखल
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 20, 2024 19:21 IST2024-06-20T19:21:18+5:302024-06-20T19:21:48+5:30
या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनकर करीत आहेत.

बदनामीची धमकी देत विवाहितेशी असभ्य वर्तन; रोमियोविरुद्ध गुन्हा दाखल
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : ‘विवाहितेचा पाठलाग करुन भेटली नाहीस तर दोघांचे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवून बदनामीची धमकी देणाऱ्या रोमियोविरुद्ध विवाहितेने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील एका नगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. सॅमसंग सिद्राम बुगले (रा. शास्त्री नगर, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडिता सायंकाळी माहेरी निघाली असताना नमूद आरोपींने पाठलाग करुन पिडितेला अडवले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु भेटली नाहीस तर आपले दोघांचे फोटो नवऱ्या दाखवतो अशी धमकी दिली. पिडितेने त्याला नकार देऊनही त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनकर करीत आहेत.