शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
3
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
4
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
5
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
6
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
7
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
8
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
9
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
10
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
11
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
12
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
13
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
14
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
15
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
16
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
18
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
19
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
20
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील शासकीय रुग्णालयावर वाढत्या रुग्णांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:19 IST

रोज होतात ४३ शस्त्रक्रिया; बाह्यरूग्ण विभागात रोज १४०० रुग्णांची तपासणी

ठळक मुद्दे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर तसेच कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे रुग्णांचा भार वाढल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात.फक्त शहरच नव्हे तर जिल्हा तसेच परराज्यातील रुग्णदेखील येथे उपचारासाठी येत असतात

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर तसेच कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचा भार वाढल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांत वादही होतो.

शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालयाचा भाग आहे. हे रुग्णालय फक्त स्पेशालिस्ट सेवा देण्यासाठी असताना इतर सेवाही या रुग्णालयाला द्याव्या लागत आहेत. फक्त शहरच नव्हे तर जिल्हा तसेच परराज्यातील रुग्णदेखील येथे उपचारासाठी येत असतात. अशातच जिल्हा रुग्णालय सुरू न झाल्याने तिथे जाणारे रुग्ण हे थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. प्राथमिक उपचार केंद्र व महापालिकांच्या रुग्णालयाची अवस्था व्यवस्थित नसल्याने याचा भार शासकीय रुग्णालयावरच पडत आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. यासोबतच रुग्णांवर उपचारदेखील करावे लागतात. अशातच रुग्णांचा भार वाढल्यास त्याचा परिणाम हा त्यांना देण्यात येणाºया सेवेवर होतो. प्राथमिक उपचार केंद्र व महापालिकांच्या रुग्णालयातील रुग्णांना तेथील डॉक्टर हे स्वत: प्रचार न करता शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात, असा आरोप शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केला.

असा आहे रुग्णालयावरील भार..- शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे १४०० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तर सरासरी रोज २० मोठ्या शस्त्रक्रिया तर २३ छोट्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. तर दिवसाला २८ महिलांची बाळंतपण करतात तर अतिदक्षता विभागात ५८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर उपचारादरम्यान मृत होणाºया रुग्णांची संख्या ही रोज सरासरी सहा आहे. सध्या रुग्णालयात एकूण ७७३ बेड असून ८०० रुग्ण अ‍ॅडमिट आहेत. तर दिवसाला १०० रुग्ण या रुग्णालयात अ‍ॅडमिट होतात. 

प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिकेची रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांनी आपली सेवा व्यवस्थित दिल्यास शासकीय रुग्णालयावर ताण पडणार नाही. या रुग्णालयाचा वापर फक्त स्पेशालिस्ट उपचार देण्यासाठी झाल्यास महाविद्यालय व येथील विद्यार्थ्यांचा खरा उद्देश सफल होऊ शकतो. - डॉ. सुभलक्ष्मी जयसवाल, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालय.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMedicalवैद्यकीय