शिवसैनिकांच्या खून प्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:34+5:302021-07-24T04:15:34+5:30

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी राजकीय वैमनस्यातून येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोन शिवसैनिकांच्या अंगावर ...

Increase in police custody of accused in Shiv Sainik murder case | शिवसैनिकांच्या खून प्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

शिवसैनिकांच्या खून प्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

Next

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी राजकीय वैमनस्यातून येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोन शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित उर्फ अण्णा फडतरे, संतोष सुरवसे, पिंटू सुरवसे, चालक भैय्या असवले अशा चौघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदला होता. या प्रकरणी टेम्पो चालक भैय्या असवले याला अटक केली होती. त्याला प्रारंभी ७ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.

भैय्या असवले यांनी मोहोळ पोलिसांना आपल्या जबाबात गुन्ह्याची कबुली देत यातील आरोपीच्या सांगण्यावरूनच आपण हे खून केल्याचे सांगितले होते. दरम्यान, या गुन्ह्यात टेम्पो चालकाच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदल्याने हा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याकडे वर्ग केला आहे.

या प्रकरणी अटकेतील टेम्पोचालक भैया असवले याला सोलापूर येथील न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. अधिक तपास आता उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

-----

Web Title: Increase in police custody of accused in Shiv Sainik murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.