शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

परिवर्तनाची सुरुवात सोलापूरपासून करायची आहे, शरद पवार यांचे वक्तत्व,  अकलूजमध्ये रत्नाई महिला वसतिगृहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:27 PM

आपण सगळे एकत्र राहिलो तर निश्चितच सरकार बदलू शकतो. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशाला परिवर्तनाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विजयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनवजा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

ठळक मुद्दे संघटनशील व्यक्तिमत्त्वाच्या शंकररावांनी सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकºयांना मालक बनवण्याचे काम केले

आॅनलाइन लोकमत सोलापूर अकलूज दि ८ : आपण सगळे एकत्र राहिलो तर निश्चितच सरकार बदलू शकतो. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशाला परिवर्तनाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विजयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनवजा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजच्या रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभासाठी खा. शरद पवार अकलूज येथे आले असताना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. दिलीप सोपल, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. हनुमंत डोळस, आ. बबनराव शिंदे, आ. नारायण पाटील, आ. दत्तात्रय सावंत, माजी मंत्री आनंदराव देवकाते, माजी आ. पी. एन. पाटील, राजन पाटील, दीपक साळुंखे, विनायक पाटील, युन्नूस शेख, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, फलटण शुगरचे प्रल्हादराव साळुंखे, बळीरामकाका साठे, कल्याणराव काळे, राजाबापू पाटील, रश्मी बागल, मनोहर सपाटे, सविताराजे भोसले, मंदाताई काळे, महेश गादेकर, चेतन नरोटे, धैर्यशील मोहिते-पाटील, किशोरसिंह माने पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि.प.सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सरपंच देवश्री मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील, सत्यशिल मोहिते-पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले की, संघटनशील व्यक्तिमत्त्वाच्या शंकररावांनी सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकºयांना मालक बनवण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज याच शेतकºयांची अवस्था भाजपा सरकारमुळे दयनीय झालेली आहे. शेतकºयांना कर्जमाफी द्यायची म्हटले की सरकारच्या पोटात दुखायला चालू होते. भाजपाचे सरकार पिकवणाºयापेक्षा खाणाºयांचीच जास्ती काळजी करते, परंतु जर पिकवणाराच जगला नाही तर खाणाºयांचे काय होईल याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. पार्लमेंटमध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणतात अर्थव्यवस्था सुधारतेय आणि शासनाचा सांख्यिकी विभाग सांगतोय अर्थव्यवस्था घसरतेय. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर शेतीचे अर्थकारण सुधारले पाहिजे. शेतकºयांच्या डोक्यावरील कर्ज कमी झाले पाहिजे, असे सांगितले.माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारीचा पाया सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी रचला. माझ्या राजकीय उमेदीच्या काळात मी अनेकवेळा शंकररावांचा सल्ला घेतला आहे. मी करमाळ्याचा आमदार असताना सकाळी नामदेवराव जगतापांच्या आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या संपर्कात असायचो. तसा आदेशच शरद पवारांनी दिला होता. २००३ साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विजयदादा उपमुख्यमंत्री झाले होते. एकाच जिल्ह्याचे दोन नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करण्याची किमया फक्त शरद पवारच करू शकतात. आज आपले पक्ष वेगळे असले तरी आपल्या विचारांचा धागा तुटता कामा नये असे शिंदे म्हणाले. प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. आभार जि.प.सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी मानले. -------------------निर्णय आम्ही घेतले...राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काळात १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण, लष्करामध्ये मुलींची भरती, सरकारी नोकरीमध्ये जागा असे महत्त्वाचे निर्णय आम्हीच घेतले आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना संधी द्यायला हवी. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी शैक्षणिक संस्था निर्माण करताना हाच विचार केला होता. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढी सक्षमपणे चालवत आहे, असे खा. शरद पवार यांनी सांगितले.-----------------माढा मतदारसंघावर अनेकांचा डोळामाढा मतदारसंघावर अनेक पक्षांचा डोळा आहे, परंतु विजयदादा खंबीर आहेत. दादांनी कोणाला डोळा मारू नये म्हणजे झाले. २०१९ चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी एकत्र येऊन वाद-विवाद, पक्ष-विपक्ष विसरून कामाला लागावे, असे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवार