मोहोळमध्ये उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:16 IST2021-05-03T04:16:57+5:302021-05-03T04:16:57+5:30

१ मे रोजी कोरोनाबाधित रुग्णांसाठी महसूल, समाजकल्याण, आरोग्य या विभागांसह अन्य विभागाच्या सहकार्याने आमदार यशवंत माने यांनी येथील मुलींच्या ...

Inauguration of Kovid Hospital at Mohol | मोहोळमध्ये उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

मोहोळमध्ये उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

१ मे रोजी

कोरोनाबाधित रुग्णांसाठी महसूल, समाजकल्याण, आरोग्य या विभागांसह अन्य विभागाच्या सहकार्याने आमदार यशवंत माने यांनी येथील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीत ऑक्सिजनचे २५ बेड, तर नॉन ऑक्सिजनचे ७५ बेड, अशा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची उभारणी केली. यावेळी माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार यशवंत माने, प्रांताधिकारी सचिन ढोले, सभापती रत्नमाला पोतदार, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, ग्रामीण रुग्णालयचे अधीक्षक डाॅ. प्रल्हाद गायकवाड, डाॅ. बालाजी गवाड, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, नगरसेवक सुशील क्षीरसागर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपसभापती अशोक सरवदे, पं.स. सदस्य जालिंधर लांडे, सिंधूताई वाघमारे, अशोक देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षीरसागर, माजी सभापती नागेश साठे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, संतोष सुरवसे, अण्णा फडतरे, प्रशांत बचुटे उपस्थित होते.

फोटो

०२मोहोळ कोविड हॉस्पिटल

ओळी

मोहोळ येथे उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील, बळीराम साठे व अन्य.

Web Title: Inauguration of Kovid Hospital at Mohol