जय जवान जय किसान दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:35+5:302020-12-30T04:29:35+5:30
अनगर : कुरणवाडी येथे सुरू केलेल्या बारामतीच्या सोनाई दूध संघाचे जय जवान जय किसान दूध संकलन शीतकरण केंद्र आणि ...

जय जवान जय किसान दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन
अनगर : कुरणवाडी येथे सुरू केलेल्या बारामतीच्या सोनाई दूध संघाचे जय जवान जय किसान दूध संकलन शीतकरण केंद्र आणि श्रीदत्त ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन युवक नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी शीतकरण केंद्रामुळे दूध उत्पादकांना याचा चांगला फायदा होईल, दरही चांगला होईल, असे म्हणाले.
यावेळी कृषिभूषण दादासाहेब बोडके, सज्जन खोत, किसन गुंड, रामेश्वर बोडके, बब्रुवान करमकर, परमेश्वर पवार, मेजर सुरेश कारमकर, रामभाऊ गुंड, राजू गुंड, धनाजी पवार, अनिल पवार, सुभाष कारमकर, अमोल कारमकर, अक्षय कारमकर, अंकुश कारमकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वा. प्र.)
-----
फोटो : २९ कुरणावाडी
कुरणवाडी येथील दूध संकलन शीतकरण केंद्राचे उद्घाटन करताना अजिंक्यराणा पाटील. यावेळी दादासाहेब बोडके, किसन गुंड, रामेश्वर बोडके.