सोलापूरमध्ये मनपा महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा कामावर हृदयविकाराने झटक्याने मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: January 18, 2023 11:00 IST2023-01-18T10:54:41+5:302023-01-18T11:00:05+5:30
सोलापूर - शहर महानगरपालिकेमधील स्वच्छता कर्मचारी महिलेचा बुधवारी सकाळी कामावर रूजू झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नागरबाई गौतम वडवेराव ...

सोलापूरमध्ये मनपा महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा कामावर हृदयविकाराने झटक्याने मृत्यू
सोलापूर - शहर महानगरपालिकेमधील स्वच्छता कर्मचारी महिलेचा बुधवारी सकाळी कामावर रूजू झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नागरबाई गौतम वडवेराव ( वय ५२, रा. न्यू बुधवार पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. मयत नागरबाई या बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कस्तुरबा भाजी मंडई गेट समोर काम करताना त्यांच्या छातीत त्रास होऊ लागला.
सहकार्यांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली असून त्यात नागरबाई या हजेरी लावण्यासाठी गेल्यानंतर त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची नोंद आहे. दरम्यान, नागरबाई यांना दोन मुले, सुन नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.