नेहरू युवा केंद्रात सापडली दारूची बाटली; भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 20, 2023 16:10 IST2023-10-20T16:10:44+5:302023-10-20T16:10:57+5:30

काही लोकांनी तक्रार केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विकास वाघमारे तसेच त्यांचे काही सहकारी नेहरू युवा केंद्रात तपासणी केली.

In Solapur Liquor bottle found at Nehru Yuva Kendra; Complaint of BJP office bearers to District Officer | नेहरू युवा केंद्रात सापडली दारूची बाटली; भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नेहरू युवा केंद्रात सापडली दारूची बाटली; भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोलापूर - नेहरू युवा केंद्रात दारूची बाटली सापडल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विकास वाघमारे तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य यतिराज होनमाने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. नेहरू युवा केंद्रात दारूची बाटली कशी आली?, याची चौकशी करून नेहरू युवा केंद्रातील अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

काही लोकांनी तक्रार केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विकास वाघमारे तसेच त्यांचे काही सहकारी नेहरू युवा केंद्रात तपासणी केली. त्या ठिकाणी त्यांना एक मोठी बॉटल सापडली. तसेच त्या ठिकाणी खाद्यपदार्थही सापडले. नेहरू युवा केंद्रातील कर्मचारी हे केंद्रात बसून दारू पितात, अशी तक्रार वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: In Solapur Liquor bottle found at Nehru Yuva Kendra; Complaint of BJP office bearers to District Officer